Riteish Tamannas Film Plan A Plan B Trailer Released Fans Will Like The Story Of Lawyer Kosti And Matchmaker
रितेश-तमन्नाचा ‘प्लॅन ए प्लॅन बी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पहा व्हिडिओ
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांचा OTT चित्रपट 'प्लॅन ए प्लान बी' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. रितेश देशमुख आणि तमन्ना भाटिया यांच्याशिवाय या चित्रपटात पूनम ढिल्लन आणि कुशा कपिला यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात रितेश देशमुख वकील कोस्तीच्या भूमिकेत आहे. तमन्ना भाटिया मॅचमेकर निरालीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. शशांक घोष दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नेटफ्लिक्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.