गुढीपाडवा म्हणजे मराठी नवं वर्षांची सुरुवात... या दिवशी प्रत्येक मराठी माणूस आनंदाची, निश्चयाची तसेच ध्येयाची गुढी उभारतो. संपूर्ण राज्यभरात पूर्ण उत्साहाचे वातावरण असते. शुभेच्छा तसेच भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते. या दिवसात तुमच्या लाडक्या प्रियजनांना हे संदेश नक्की द्या.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने 'या' शुभेच्छा द्या. (फोटो सौजन्य - Social Media)
वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा…
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष! आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,