रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. अजय देवगणपासून दीपिका पादुकोणपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मुख्य भूमिकेत काम करण्यासाठी तगडं मानधन स्वीकारलं आहे.
बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करणारा ‘सिंघम अगेन’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या
सपशेल फसलेली कॉमेडी आणि बुचकळ्यात टाकणारं कथानक; अजय देवगण आणि रोहित शेट्टीच्या Singham Again चा वाचा Review
350 कोटींच्या बिग बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात सर्व कलाकार एक ॲव्हेंजर्स प्रेरित कॉप युनिव्हर्स करण्यासाठी एकत्र आले आहेत, ज्याचे मूळ रामायणात आहे.
जागरणमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अजय देवगणने या चित्रपटासाठी तब्बल ३५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
अजय देवगणनंतर अक्षय कुमारने चित्रपटात सर्वाधिक मानधन घेतले आहे. अक्षय कुमारने या चित्रपटासाठी २० कोटी रुपये घेतले.
करीना कपूरला चित्रपटासाठी दीपिकापेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत. या चित्रपटासाठी लेडी सिंघम दीपिकाला ६ कोटी रुपये तर करीना कपूरला १० कोटी मानधन मिळाले आहे.
अर्जुन कपूरला या चित्रपटासाठी ६ कोटी रुपये मानधन, तर रणवीर सिंगला या चित्रपटासाठी १० कोटींचं मानधन मिळालंय.
तर, जॅकी श्रॉफला २ कोटींची ऑफर देण्यात आली आहे. तर टायगर श्रॉफला ३ कोटी रुपये मानधन मिळालंय.