बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आता लवकरच तिच्या आयुष्यात दुसऱ्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा करत एका स्टायलिश लूकमध्ये स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. तसेच अभिनेत्रीने तिचा क्युट बेबी बंप देखील दाखवला आहे. चाहते तिच्या फोटोला कंमेंट करून चांगला प्रतिसाद देत आहेत.
सोनम कपूरने प्रेग्नन्सीची केली घोषणा; क्युट बेबी बंपसह शेअर केले फोटो (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आता दुसऱ्या बाळाचे लवकरच स्वागत करणार आहे. तिने तिच्या दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा एका अनोख्या पद्धतीने केली असून, तिचे फोटो चर्चेत आहे.

सोनम कपूरने गुलाबी रंगाच्या पोशाखात अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या बेबी बंप दाखवताना दिसत आहे. तसेच तिची स्टाईल चाहत्यांना आवडली आहे.

सोनमने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा अतिशय स्टायलिश पद्धतीने केली आहे. सोनमने हे फोटो शेअर करताना "Mother" असे कॅप्शन देखील लिहिले आहे.

सोनमच्या गरोदरपणाच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत होत्या, परंतु अभिनेत्रीने यावर मौन बाळगले होते. आता तिने एक पोस्ट शेअर करून ही घोषणा केली आहे.

सोनमच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, तिने गुलाबी स्कर्टसोबत लांब ब्लेझर घातला होता. तिने काळी बॅग आणि सनग्लासेसने आपला लूक परिपूर्ण केला आहे. तसेच तिने तिचा लूक खूपच आकर्षित ठेवला आहे.






