जेवणातील सर्वच पदार्थ चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक असतात. बऱ्याचदा लहान मुलांसह मोठ्यांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही. भाज्यांचे नाव घेतल्यानंतर मुलं नाक मुरडतात. त्यामुळे मुलांना तुम्ही वाफवून घेतलेल्या भाज्या खाण्यास देऊ शकता. भाज्या वाफवल्यामुळे त्यातील कीड किंवा इतर विषारी घटक नष्ट होऊन जातात. याशिवाय भाज्यांची चव सुद्धा सुंदर लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या वाफवलेल्या भाज्यांचे रोजच्या आहारात सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाज्या खाल्ल्यास शरीराला पोषण मिळेल. (फोटो सौजन्य – istock)
वाफवून घेतलेल्या 'या' भाज्या चवीसोबत आरोग्यासाठी ठरतील गुणकारी
हिरव्या रंगाची ब्रोकोली आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीराला पोषण देतात. शिजलेल्या ब्रोकोलीपासून तुम्ही सूप किंवा पराठा बनवू शकता.
गोडसर चवीचा गाजर डोळ्यांचे आरोग्य सुधारतो. त्यामुळे जेवणातील सॅलडमध्ये गाजर खावे. गाजर सॅलड बनवण्याआधी त्याला एक वाफ घेतल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सूप बनवू शकता.
पालकची भाजी तुम्ही तेलाचा वापर न करता बनवू शकता. पालकच्या भाजीमध्ये असलेले पौष्टिक घटक शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढतात.
हळद आणि मीठ टाकून वाफवून घेतलेला फ्लॉवर चवीला अतिशय सुंदर लागतो. फ्लॉवरची भाजी बनवण्याआधी फ्लॉवर शिजवून घ्यावा. यामुळे कीड निघून जातात.
वाफवलेले मक्याचे दाणे चवीला अतिशय सुंदर लागतात. मक्याच्या दाण्यांचे चाट किंवा मक्याच्या दाण्यांची भेळ सुद्धा बनवू शकता.