सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारी Influencer आणि गायिका स्वानंदी सरदेसाईने गुपचूप विवाहसोहळा हुरकला आहे. अगदी कोकणी पद्धतीचे मांडव सजले आहे आणि गावाकडेच तिने हा सोहळा हुरकला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गायिकेने ही आनंदाची बातमी दिली आहे. "१९-०४-२०२६" अगदी अक्षय तृतीयेच्या दिवशीच तिने लग्नकार्य केले आहे.
स्वानंदी सरदेसाईने विक्रांत रामदाससह बांधली लग्नगाठ! (फोटो सौजन्य - Social Media)

या सोहळ्यात स्वानंदीने हिरव्या रंगाची नववारी नेसली आहे. कपाळावर मुंडावळ्या आणि सुशोभित दागिने, विशेषकरून तिच्या नाकातली नथ विशेष लक्ष खेचून घेत आहे.

स्वानंदीने विक्रांत रामदाससह लग्नकार्य केले आहे. विक्रांतने सफेद सदरा आणि धोतर नेसली आहे.

स्वानंदीने पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. पोस्टखाली कॅप्शनमध्ये तिने "श्री. व सौ. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर : १९-०४-२०२६" असे नमूद केले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट्सकरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत आणि दोघांच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रार्थना केली आहे.

स्वानंदीने गुपचूप लग्न हुरकले असून लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.






