(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
भारती सिंग हिने सूत्रसंचालन केलेल्या या शोमध्ये सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंग सोखी यांनी स्पर्धकांच्या पाककौशल्याची परीक्षा घेतली. संपूर्ण सीझनमध्ये स्पर्धकांना विविध पाककृती, वेळेच्या मर्यादेत पूर्ण करायची आव्हाने आणि मजेशीर टास्कचा सामना करावा लागला. कृष्णा अभिषेक आणि सुदेश लाहिरी यांच्या विनोदी अंदाजाने शोमध्ये हास्याची रंगत कायम राहिली.
‘लाफ्टर शेफ्स सीझन ३’ची विजेती जोडी
स्पर्धक जोड्यांमध्ये, अली आणि जन्नत त्यांच्या सांघिक कामगिरीमुळे आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे उठून दिसले. स्वयंपाकघरात अलीने आत्मविश्वास दाखवला, तर जन्नतने नवीन गोष्टी शिकण्याच्या तिच्या उत्सुकतेने सर्वांना प्रभावित केले. या गुणांमुळे या जोडीला कठीण कामे आणि अनपेक्षित वळणांना सामोरे जाण्यास मदत झाली.
विशेष म्हणजे, संपूर्ण सीझनमध्ये तेजस्वी प्रकाशकडे सर्वाधिक स्टार्स होते. तिच्या पाठोपाठ करण कुंद्रा आणि एल्विश यादव होते. मात्र अंतिम फेरीत त्यांना विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आणि अली-जन्नत या जोडीने ट्रॉफी आपल्या नावावर केली.
ग्रँड फिनालेला चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी तसेच ‘खतरों के खिलाडी’च्या आगामी पर्वातील स्पर्धकांनीही विशेष उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे अंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढली.
विजयानंतर भावना व्यक्त करताना जन्नत जुबैर म्हणाली, “‘लाफ्टर शेफ्स’ हा असा कार्यक्रम आहे, जिथे फक्त एकच विजेता नसतो. आम्ही ट्रॉफी जिंकली असली तरी या शोशी जोडलेला प्रत्येक जण विजेता आहे. आम्ही एकत्र हसलो, एकत्र शिकलो आणि एकत्र प्रगती केली. हीच भावना या प्रवासाला खास बनवते.”
View this post on Instagram
ती पुढे म्हणाली, “या शोने मला शिकवलं की मैत्री, दयाळूपणा आणि सांघिक भावना या जिंकण्याइतक्याच महत्त्वाच्या असतात. हा प्रवास अविस्मरणीय बनवणाऱ्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानते.”
‘लाफ्टर शेफ्स सीझन ३ मधील जोड्या
‘लाफ्टर शेफ्स सीझन ३’मध्ये कृष्णा अभिषेक-काश्मेरा शाह, अली गोनी-जन्नत जुबैर, अंकिता लोखंडे-विकी जैन, तेजस्वी प्रकाश-अर्जुन बिजलानी, करण कुंद्रा-एल्विश यादव, निया शर्मा-सुदेश लाहिरी आणि समर्थ जुरेल-अभिषेक शर्मा या लोकप्रिय जोड्यांनी सहभाग घेतला होता.






