गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये या दिवशी 19 नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाला होता. भारताच्या पराभवामुळे 140 कोटी भारतीय चाहत्यांची मनं तुटली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताचा पराभव कोणालाच पचवता आला नव्हता. दिनाचे काही आठवणींवर एकदा नजर टाका.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या पराभवाचा भारताच्या १४० करोड नागरिकांच्या डोळ्यात अश्रू. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघ भारतासाठी आपत्तीजनक ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या स्पर्धेत भारताच्या संघाने एकही सामना न गमावता टीम इंडियाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला 240 धावांत गुंडाळले. या काळात टीम इंडियाचे बहुतांश फलंदाज फ्लॉप दिसले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी एकही सामना गमावला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अंतिम फेरी गाठण्यापूर्वी सलग 9 साखळी सामने जिंकले होते. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
उपांत्य फेरीतील सलग 10 वा सामना जिंकला. उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडला दणदणीत पराभव पत्करावा लागला होता, जे त्यांच्यासाठी आयसीसी टूर्नामेंटमध्ये नेहमीच मोठे आव्हान होते. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
न्यूझीलंडसारख्या संघाला उपांत्य फेरीत पराभूत केल्यानंतर टीम इंडिया सहज फायनल जिंकून एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावेल, अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही. फोटो सौजन्य - सोशल मीडिया