फिरायला कुणाला आवडत नाही. कामातून वेळ काढून लोक आपल्या कुटुंबासह फिरण्याचा प्लॅन करतात. कुठेही फिरायला जायचे म्हटले की मग बजेट प्लॅनिंग आलीच. आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी खाण्या-पिण्याचा, राहण्याचा खर्च किती येईल या सर्व गोष्टींचा विचार करून मग आपण त्या ठिकाणाला भेट देतो. आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका ठिकाणाविषयी माहिती सांगत आहोत जिथे तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय अगदी फ्री मध्ये फिरू शकता. या ठिकाणी फिरण्यासाठी किंवा राहण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. चला हे ठिकाण कोणते आहे ते जाणून घेऊया.
भारतातील एकमेव असे ठिकाण जिथे फुकटात फिरता-राहता येतं, 1 रुपयाही खर्च करण्याची गरज नाही; फक्त एक अट पूर्ण करावी लागेल
हे शहर चेन्नईतल्या तमिळनाडू येथील विल्लूपुरम जिल्ह्यात वसले आहे. या शहराचे नाव ऑरोविले (Auroville) असे आहे, जे चेन्नईपासून हे शहर 150 किमी अंतरावर आहे. याला ' Sun Of Dawn ' असेही म्हटले जाते
या शहरात ' मातृमंदीर ' नावाचे एक मंदिर आहे, जिथे लोक योगासने व मेडिटेशन करतात. विशेष म्हणजे इथे कोणत्याही धर्माचे पालन केले जात नाही. तसेच इथे कोणत्याही देवी देवतांची पूजा केली जात आंही
या शहरात राहण्यासाठी तुम्हाला एक अट पूर्ण करावी लागेल आणि ती म्हणजे इथे तुम्हाला एक सेवक म्हणून राहायचे आहे. इथे राहून तुम्हाला लोकांची सेवा करावी लागेल.
या शहरात कोणीही येऊन स्थायिक होऊ शकतं. या शहरात जवळपास 50 वेगवेगळ्या देशांचे लोकं राहतात.
इ.स.1968 साली मीरा अल्फास यांनी ऑरोविला यांनी या शहराची स्थापना केली होती. कोणताही भेदभाव, जातिभेद न मानता लोकांनी एकोप्याने रहावे या उद्देशाने या शहराची स्थापना करण्यात आली.