सकाळी उठल्यानंतर अनेकांना सगळ्यात आधी कॉफी पिण्याची सवय असते. कॉफी प्यायल्यानंतर दिवसाची सुरुवात अतिशय आनंद आणि उत्साहाने होते. कोफचे सेवन केल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. पण अतिप्रमाणात कॉफी प्यायल्यास शरीराला हानी पोहण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दिवसभरातून दोनदा किंवा तीनदाच कॉफीचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला जगातील सगळ्यात महागड्या कॉफी कोणती? ही कॉफी कशा पद्धतीने तयार केली जाते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
हत्तीच्या विष्ठेचा वापर करून तयार होते जगातील सर्वात महाग कॉफी! जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

जगातील सगळ्यात महागड्या कॉफीचे नाव 'ब्लॅक आयव्हरी कॉफी' आहे. ही कॉफी तयार करण्यासाठी हत्तीच्या विष्ठेचा वापर केला जातो. याशिवाय अतिशय महागडी कॉफी थायलंडमध्ये तयार केली जाते.

कॉफी तयार करण्यासाठी हत्तीला सगळ्यात आधी 'अरेबिका' जातीच्या कॉफीच्या पिकलेल्या चेरी खायला दिल्या जातात. पिकलेल्या चेरी हत्तीने खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटातील एन्झाइम्स आणि बॅक्टेरिया कॉफी बीन्समधील प्रथिने तोडतात, ज्यामुळे कॉफीचा कडवटपणा कमी होऊन जातो.

हत्तीने चेरी खाल्ल्यानंतर साधारण 15 ते 70 तासांनी कॉफी बीन्स हत्तीच्या विष्ठेतून बाहेर पडतात. विष्ठेतून पडलेल्या कॉफी बीन्स जमा केल्या जातात. त्यानंतर त्या अत्यंत काळजीपूर्वक धुतल्या जातात. त्यानंतर उन्हात सुकवून भाजल्या जातात.

हत्तीच्या विष्ठेतून बाहेर पडलेल्या कॉफी बीन्स शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतात. 33 किलो कॉफी चेरी हत्तीला खाऊ घातल्यानंतर त्यातून केवळ 1 किलो कॉफी बीन्स हत्तीच्या विष्ठेतून बाहेर पडतात. ही अतिशय हळू आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे.

हत्तीच्या विष्ठेतून बाहेर पडलेल्या कॉफी बीन्सची किंमत साधारण 50 ते 80 हजार रुपये प्रति किलो आहे. ही कॉफी चवीला अतिशय गोडसर लागते.






