मधुमेह झाल्यानंतर आरोग्य बिघडू लागते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात कमी साखरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. अतिसाखर किंवा गोड पदार्थ खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. अशावेळी योग्य आहार घेऊन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी. आज आम्ही तुम्हाला वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील रक्तातील पातळी नियंत्रणात राहील.(फोटो सौजन्य – iStock)
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी ठरतील 'हे' पदार्थ
अंड खायला सगळ्यांचं आवडतं. अंड्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात तुम्ही नाश्त्यात उकडलेले अंडे, ऑम्लेट किंवा अंड्यांपासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता.
हिरव्या भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. पालक, मेथी, ब्रोकोली, लाल माठ, मुळा इत्यादी भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.
बदाम, काजू, अक्रोड, जवस बिया, पांढरे तीळ इत्यादी बियांचे सेवन केल्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. याशिवाय शरीराचे कार्य सुधारते. ड्रायफ्रुटचा वापर करून स्मूदी देखील बनवू शकता.
सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खायचा असेल तर तुम्ही ओट्सचे सेवन करू शकता. ओट्स खाल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आढळून येतात, जे हळूहळू पचन होतात. त्यामुळे तुम्ही दही किंवा दुधात ओट्स मिक्स करून खाऊ शकता.
चवीला आंबट गोड असलेले दही सगळ्यांचं आवडतं. यामध्ये प्रथिने आणि प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आढळून येतो. मधुमेह झाल्यानंतर दह्याचे सेवन करावे. याशिवाय दह्याचे नियमित सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.