वय वाढल्यानंतर शरीरात हळूहळू अनेक बदल दिसू लागतात. या बदलांकडे महिला गांभीर्याने लक्ष देत नाहीत. हाडांचे दुखणे, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या, बारीक रेषा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावरील चमक कमी होऊन त्वचा निस्तेज दिसू लागते. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात कोलेजनची कमतरता निर्माण होणे. त्वचा कायमच चमकदार ठेवण्यासाठी शरीरात कोलेजन योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला कोलेजनची पातळी वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरातील कमी झालेले कोलेजनची पातळी भरून काढण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ

टोमॅटोमधील लायकोपीन सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करते. जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे त्वचा उजळदार होते.

हिरव्या पालेभाज्या शरीरासाठी वरदान आहेत. रोजच्या आहारात एकतरी पालेभाजी नेहमीच खावी. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते आणि कोलेजनची पातळी वाढण्यास मदत होते.

लसूणमध्ये सल्फर नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे कोलेजन तयार होते. शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित एक कच्ची लसूण पाकळी चावून खावी.

आवळा शरीरासाठी सुपरफूड मानला जातो. आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरपूर विटामिन सी मिळते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. त्वचा मजबूत आणि चमकदार ठेवण्यासाठी नियमित एक आवळा खावा.

बदाम, अक्रोड, काजू, जवस आणि चिया बियांमध्ये झिंक आणि निरोगी चरबी असतात. ज्यामुळे कोलेजन वाढण्यास मदत होते. नियमित सकाळी उठल्यानंतर सुका मेवा खावा.






