Maria Machado: 'आता स्वातंत्र्याची वेळ...' निकोलस मादुरोच्या अटकेनंतर मारिया मचाडो यांचा हुंकार; व्हेनेझुएलात ट्रम्प पर्वाची सुरुवात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Maria Corina Machado response to Maduro capture : व्हेनेझुएलाच्या (Venezuela) राजकारणातील सर्वात धाडसी महिला आणि २०२५ च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो (Maria Corina Machado) यांनी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेचे जोरदार स्वागत केले आहे. अमेरिकेने केलेल्या या लष्करी कारवाईला त्यांनी “वचनाची पूर्तता” असे संबोधले असून, व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी ही खरी स्वातंत्र्याची पहाट असल्याचे म्हटले आहे. दीर्घकाळापासून अज्ञात वास्तव्य करत असलेल्या मचाडो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक भावनिक पत्र लिहून जनतेला संबोधित केले.
मारिया मचाडो यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, “व्हेनेझुएलाच्या लोकांनो, तुमच्या स्वातंत्र्याची वेळ आली आहे! निकोलस मादुरो आता त्या गुन्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय न्यायाला सामोरे जातील, जे त्यांनी आपल्या देशाविरुद्ध केले आहेत.” त्यांनी पुढे म्हटले की, मादुरो यांनी चर्चेद्वारे सत्ता सोडण्यास नकार दिल्याने अमेरिकेला हा कठोर निर्णय घ्यावा लागला. गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाहीसाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हा विजय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Arrested : अमेरिकेची गुंडगिरी! चीनच्या नाकाखालून मादुरोला उचललं; ड्रॅगनने व्यक्त केला तीव्र संताप
मारिया मचाडो यांनी एक मोठी राजकीय मागणी केली आहे. जुलै २०२४ च्या निवडणुकीत ज्यांच्या विजयाचा दावा विरोधकांनी केला होता, त्या एडमुंडो गोंझालेझ उरुतिया (Edmundo González Urrutia) यांना तात्काळ राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. “जनतेने गोंझालेझ यांना स्पष्ट जनादेश दिला होता, जो मादुरो सरकारने चोरला होता. आता ती चूक सुधारण्याची वेळ आली आहे,” असे मचाडो यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी आंतरराष्ट्रीय देशांनाही गोंझालेझ यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मान्यता देण्याची विनंती केली आहे.
Venezuelan opposition leader and Nobel Peace Prize winner María Corina Machado following the Maduro capture “We are ready to take over the government” (Via Bloomberg) pic.twitter.com/NE7ss8QxBK — yeet (@Awk20000) January 3, 2026
credit : social media and Twitter
व्हेनेझुएलाच्या लष्कराला उद्देशून मचाडो म्हणाल्या की, आता कोणा एका व्यक्तीची गुलामगिरी करण्याची गरज नाही. लष्कराने संविधानाचे पालन करावे आणि लोकशाही संक्रमणात अडथळा न आणता सहकार्य करावे. “लष्करी अधिकाऱ्यांनी आता हे ओळखले पाहिजे की त्यांच्या कुटुंबाचे भविष्य देखील एका मुक्त व्हेनेझुएलामध्येच सुरक्षित आहे,” असे आवाहन त्यांनी केले. कराकसमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kamala Harris: ‘ड्रग्ज ही केवळ थाप आहे!’ Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड, मादुरोच्या अटकेवर संताप
मचाडो यांनी केवळ जल्लोषच केला नाही, तर देशाच्या पुनर्बांधणीचा आराखडाही मांडला. राजकीय कैद्यांची सुटका करणे, विखुरलेल्या कुटुंबांना पुन्हा एकत्र आणणे आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही त्यांची प्राथमिकता असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची सूत्रे तात्पुरती हातात घेण्याचे संकेत दिले असले, तरी मचाडो यांचा आग्रह आहे की सत्ता ही लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या व्हेनेझुएलाच्या नेत्यांकडेच असावी.
Ans: त्या व्हेनेझुएलातील प्रमुख विरोधी पक्षनेत्या आणि २०२५ च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या आहेत, ज्यांनी मादुरोच्या हुकूमशाहीविरुद्ध लढा दिला आहे.
Ans: त्यांनी लष्कराला एडमुंडो गोंझालेझ यांना अध्यक्ष म्हणून मान्यता देण्याचे आणि लोकशाही संक्रमणात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Ans: ते व्हेनेझुएलाच्या २०२४ च्या निवडणुकीतील विरोधी पक्षाचे उमेदवार होते, ज्यांना अनेक देश व्हेनेझुएलाचे खरे निवडून आलेले अध्यक्ष मानतात.






