तुळशीचे लग्न झाल्यानंतर लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात होते. लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासून तयारी केली जाते. लग्नातील कपड्यांपासून ते अगदी केसांमध्ये कोणत्या डिझाईनची हेअर ॲक्सेसरीज घालावी इत्यादी सर्वच गोष्टींची खरेदी केली जाते. लग्न सोहळ्यात सगळ्यांचं सुंदर आणि उठावदार दिसायचे असते. यासाठी मेकअप आर्टिस्टकडून छान मेकअप करून घेतला जातो. पण साडी किंवा ड्रेसवर कोणत्या डिझाईनची हेअर ॲक्सेसरीज घालावी? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात कायमच निर्माण होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हेअर ॲक्सेसरीजच्या काही आकर्षक डिझाईन्सबदल सांगणार आहोत. या डिझाईनच्या हेअर ॲक्सेसरीज नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नातील हेअर स्टाईल आकर्षक दिसण्यासाठी वापरा 'या' डिझाईनचे Hair Accessories

बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईनचे क्लिप्स आणि ब्रोच उपलब्ध आहेत. लहान केसांची हेअर स्टाईल केल्यानंतर त्यावर तुम्ही नाजूक साजूक पण भरीव डिझाईन असलेले ब्रोच लावू शकता.

लहान केस कायमच कर्ल्स केले जातात किंवा स्ट्रेटनिंग करून बांधले जातात. अशावेळी तुम्ही वेगवेगळ्या फुलांचा किंवा गजऱ्याचा वापर करून या पद्धतीने केसांमध्ये फुले लावू शकता.

साऊथ इंडियन किंवा स्लिक साडीवरील हेवी लूक करताना या डिझाईनची हेअर ॲक्सेसरीज वापरल्यास तुम्ही चारचौघांमध्ये उठावदार आणि सुंदर दिसाल. हेअर ॲक्सेसरीज लावल्यानंतर इतर कोणत्याही गोष्टींची आवश्यकता भासणार नाही.

लेहेंगा घातल्यानंतर या पद्धतीने हेअर स्टाईल केल्यास तुमचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसेल. मीनाकारी वर्क करून तयार केलेला हेअर ब्रँड अतिशय सुंदर दिसेल.

वेणी हेअर स्टाईल केल्यानंतर त्यावर या डिझाईनची हेअर ॲक्सेसरीज लावावी. यामुळे तुमचा लुक ट्रेडिशनल आणि मॉर्डन दिसेल.






