चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कामाच्या धावपळीमुळे अनेकदा जेवल्यानंतर काही लोक लगेच झोपतात. मात्र ही अत्यंत चुकीची सवय आहे. लगेच झोपल्यामुळे शरीराची हालचाल कमी होते आणि अन्नपदार्थ पचन होण्यास अधिकचा वेळ लागतो. यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडते. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे नियमित जेवल्यानंतर ५ मिनिटं चालणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला जेवल्यानंतर ५ मिनिटं चालल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीर सुधारण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – iStock)
जेवल्यानंतर चालल्यामुळे शरीराला होणारे फायदे
जेवल्यानंतर नियमित ५ मिनिटं चालल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय अननपदार्थ सहज पचतात. गॅस, आम्लता आणि अपचन इत्यादी अनेक समस्यांपासून सुटका मिळते. आतड्यांचे आरोग्य सुधारते.
मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित ५ ते १० मिनिटं चालणे आवश्यक आहे. चालल्यामुळे शरीराची हालचाल होते. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणे आवश्यक आहे. या सवयींमुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका देखील कमी होतो.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित ५ किंवा त्यापेक्षा जास्त चलावे. यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते. तसेच शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
जेवल्यानंतर चालण्यास किंवा बाहेर फिरण्यास गेल्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित चालावे.
मानसिक तणाव वाढल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे जेवल्यानंतर किंवा इतर वेळी रोज चालण्यास जावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. चिंता, तणाव कमी होऊन मूड सुधारतो.