इंडियन प्रीमियर लीग २०२५ ची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड सुरु आहे, सध्या आयपीएल २०२५ च्या मेगाऑक्शनच्या संदर्भात बरीच वृत्त येत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा समावेश त्या ४ आयपीएल संघांपैकी आहे ज्यांना आतापर्यंत जेतेपद जिंकण्यात अपयश आले आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल २०२५ मध्ये १८ वर्षांचा दुष्काळ संपवू शकेल का? वास्तविक, याआधी आयपीएलचा मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी आरसीबीचा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करेल आणि कोणत्या नव्या खेळाडूंना संघामध्ये संधी देईल याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे. मेगा लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कोणत्या खेळाडूंना खरेदी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बंगळुरूच्या इतिहासात 5 सर्वात महागड्या खेळाडूंवर एक नजर टाका.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सर्वात महागडे खेळाडू. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
कायली जेमसन - आयपीएल २०२१ च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने न्यूझीलंडच्या काइली जेमिसनवर पैशांचा वर्षाव केला होता. आरसीबीने काइली जेमसनला विक्रमी १५ कोटी रुपयांना संघात घेतले होते. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
एबी डिव्हिलियर्स - दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स बराच काळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. या फलंदाजाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खूप धावा केल्या. आयपीएल २०११ च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एबी डिव्हिलियर्सला ११ कोटी रुपयांना खरेदी केले होते. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
कॅमेरॉन ग्रीन - आयपीएल २०२४ पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कॅमेरून ग्रीनचा मुंबई इंडियन्सशी व्यवहार केला. यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १७.५ कोटी रुपये खर्च करावे लागले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
युवराज सिंग - युवराज सिंग आयपीएलच्या इतिहासातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल २०१४ च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने युवराज सिंगला १४ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
ग्लेन मॅक्सवेल - आयपीएल २०२१ च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला १४.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. अशाप्रकारे, ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या इतिहासातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सर्वात महागडा खेळाडू आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया