डोळ्यांचा थकवा ही एक सामान्य समस्या आहे. त्यात डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे, खाज सुटणे, लालसरपणा, अंधुक दृष्टी, डोकेदुखी यांचा समावेश आहे. डोळ्यांच्या थकव्याची अनेक लक्षणे असू शकतात. सहसा, स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे, वाचन करणे किंवा गाडी चालवणे देखील डोळ्यांचा थकवा निर्माण करू शकते. डोळ्यांचे डॉक्टर अमन कुकरेजा यांनी काही महत्त्वाची माहिती यासंदर्भात दिली आहे (फोटो सौजन्य - iStock)
डोळे अचानक कोरडे पडतात आणि थकवाही येतो. पण याची नक्की काय कारणे आहेत हे आपण या फोटोगॅलरीतून जाणून घेऊया
आजच्या काळात लोक 9-10 तास लॅपटॉपवर सतत काम करतात, मुले तासनतास स्क्रीनवर घालवतात. संगणक, लॅपटॉप, मोबाईल फोन किंवा टॅब्लेट सारख्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांना थकवू शकतो
बराच वेळ गाडी चालवल्यानंतर डोळेही थकतात. गाडी चालवताना, एखादी व्यक्ती पूर्ण एकाग्रतेने रस्त्याकडे पाहत राहते, ज्यामुळे डोळ्यांना थकवा येऊ शकतो
विश्रांती न घेता तासनतास वाचन केल्याने डोळ्यांना थकवा येऊ शकतो. डोळ्यांना थकवा येतो विशेषतः जेव्हा तुम्ही कमी प्रकाशात वाचता, त्यामुळे योग्य प्रकाशाची काळजी घ्यावी
झोपेचा अभाव डोळ्यांना थकवा देतो. पुरेशी झोप न मिळाल्याने डोळ्यांच्या स्नायूंना थकवा येऊ शकतो आणि डोळ्यांभोवती सूजदेखील येऊ शकते
डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही काम करताना मध्येमध्ये डोळ्यांना आराम द्या. डॉक्टरांच्या मदतीने ड्रॉप विचारून ते घालत जा