Photo Credit- Social Media 'हे भाजप चे केवळ दबावतंत्र आहे का?' नारायण राणेंच्या दाव्यावर दमानियांचा थेट सवाल
बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन राजकारण रंगले आहे. मागील दोन महिन्यांपासून न्यायासाठी लढा दिला जात असून अनेक नेत्यांवर यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाला आता दोन महिने होत आले असून यामधील आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे. बीड हत्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतील आहे.
बीड हत्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी अनेक धक्कादायक दावे आणि आरोप केले आहे. बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करुन पुरावे देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता पुन्हा एकदा दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केली असून मुंडेंची आमदारकी देखील जाईल, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मास्टर माईंड आरोपी वाल्मीक कराड आणि अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यामधील अर्थिक व्यवहार देखील समोर आणले आहेत. अंजली दमानिया म्हणाल्या की, “आपण ज्या एफआयआरबाबत आपण बोलत होते तो हाच एफआयआर आहे. मी सांगितलं होतं की यावर गंभीर गुन्हे होते. पण चार्जशीटबाबत विचारणा केली तर पुराव्याअभावी नाव वगळली असे सांगण्यात आले, वाल्मिकी आण्णा तिथे नव्हते असं सांगण्यात आले, पुर्ण चौकशी झाली नाही, डीजींकडे पत्र दिले आहे. त्यात ही केस रिओपन करा अशी मागणी आपण केली आहे, ज्याच्यावर हल्ला झाला तोच जेलमध्ये सडत आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात येत आहे” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की, “वाल्मिकी कराड याचे नाव वगळण्यात आले आहे. पुराव्याअभावी त्याला सोडण्यात आले आहे. काल ऑडीओ क्लिप बाहेर आली आहे. पोलीस अधिकारी बल्लाळ यांचा आवाज असेल तर त्यांची चौकशी व्हावी,सर्व यंत्रणा कराडच्या दिमतीला आहेत असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. ३०२ कोणावर लावायचा हे हेच ठरविणार. कुणाला वाचवायचं हे पण तेच ठरविणार. विष्णु चाटे याला चॉईज ऑफ जेल दिले जाते आहे यातच हे सर्व आले,” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी धनंजय मुंडे यांच्या आमदारकीवर संशय घेतला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, “छगन भुजबळ याना तुरूंगात जशी छातीत कळ यायची तशीच आता वाल्मिकी कराडला येत असेल. त्याच्यापोटी मेडीकल ग्राऊंड तयार केला जात आहे. राजकारण्यांना लाज शरम राहीलेली नाही. महाजेनकोतून आर्थिक लाभ धनंजय मुंडे यांनी घेतला आहे, जर कारवाई झाली तर त्यांची आमदारकी रद्द होईल असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. घरकुल योजना, कृषी पंप घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांचे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहेत. ८०० रुपयांचा फरक आहे, कित्येक कोटी कमावले आहेत असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तृप्ती देसाई काय बोलल्या ? हे मला माहिती नाही पण वाल्मिक कराडचे हात धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहचत असतील तर व्हिडियो कॉन्फरन्सिंग करा, त्याने तोंड ऊघडले तर धनंजय मुंडेंना भोगावं लागेल,” असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.