अंजली दमानिया यांनी केले करुणा धनंजय मुंडे यांचे अभिनंदन केले आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : बीड हत्या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल देत धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांना कौटुंबिक हिंसाचारामध्ये दोषी ठरवल्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. यावर आता अंजली दमानिया यांनी पोस्ट केली आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करुणा मुंडे यांना अभिनंदन केले आहे. अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत, असे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एका वाहिनीशी संवाद साधताना अंजली दमानिया म्हणाल्या की, “एखाद्याच्या पापाचा घडा घातला भरला की परमेश्वर सुद्धा दिशा देतो असेच मला वाटत आहे. धनंजय मुंडे यांचा दोन तासात राजीनामा घेणं गरजेचं आहे. तिसरा तासपण लागला नाही पाहिजे. जो व्यक्ती घरगुती हिंसाचार करत असेल, हे मी म्हणत नाही, करुणा शर्मा म्हणत नाहीत, कोर्टानं म्हटलं आहे. आता तरी या सगळ्या गोष्टी कळायला हव्या, तातडीनं राजीनामा घ्यावा, मी आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना मेसेज पाठवणार आहे. तातडीनं राजीनामा घेतला पाहिजे,” असा घणाघात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेमकं प्रकरण काय?
धनंजय मुंडे यांच्या पूर्व पत्नी करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. घरगुती हिंसाचाराचे आरोप करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंसाचाराची केस दाखल केली होती. यामध्ये कोर्टाने धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवले आहे. करुणा मुंडे यांचे आरोप कोर्टाने स्वीकारले आहेत. करुणा मुंडे यांनी दरमहा 15 लाख रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने दिलासा दिल्यानंतर करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे.
काय म्हणाल्या करुणा मुंडे?
माध्यमांशी संवाद साधून करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, करुणा मुंडे यांनी एका वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कौटुंबिक न्यायालयाचे आभार मानले आहेत. करुणा मुंडे म्हणाल्या की, “न्यायालयाचे मी खूप आभार मानते. आज सत्याचा विजय झाला आहे. लोकांना असं वाटतं की कोर्टामध्ये न्याय मिळत नाही, पण मला न्याय मिळाला आहे. औरंगाबाद कोर्टामध्ये देखील माझा विजय झाला होता. आता वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये देखील माझा विजय झाला आहे. त्यामुळे न्यायालयाचे आणि न्यायाधीश यांचे आभार मानते माझ्यासोबत माझी मुलं बाळं राहतात. आम्हाला तिघांना पाच पाच लाख तरी मिळतील म्हणून 15 लाखांची मागणी होती. मात्र आम्हाला कोर्टाकडून दोन लाख मिळाले आहेत. त्यामुळे पोटगी जास्त मिळावी म्हणून मी या ऑर्डरच्या विरोधात हाय कोर्टामध्ये जाणार आहे,” असा आक्रमक पवित्रा करुणा मुंडे यांनी घेतला आहे.