उद्धव ठाकरे आणि नितेश राणे यांच्यामध्ये राजकीय वाद सुरु झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले आहे. यामध्ये अनेक विषयांवरुन राजकारण रंगले. दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणावर देखील राजकारण रंगले. या प्रकरणामध्ये दिशा सालियान हिच्या वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा दावाकेला होता. मात्र पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर तिच्या घरातील अर्थिक स्थिती यावरुन तिने आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याला मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय वाद होताना दिसत आहे.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंना टोला लगावला होता. यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले नितेश राणे?
“गुढीपाडाव्याच्या आधी जनतेला एक गोड बातमी देण्यासाठी आज पत्रकार परिषद आहे. जिल्ह्यातील प्रशासनात आर्थिक शिस्त आणणार असा जिल्ह्यातील जनतेला शब्द दिला होता. त्यानुसार 31 मार्च पर्यत मागील शिल्लक 250 कोटी निधी खर्च करुन नवीन निधीच नियोजन केलं जाईल असं मी अश्वासन दिल होतं. सोमवारी 31 मार्च आहे, 98 टक्के निधी आज पर्यंत खर्च झालाय” अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की “राज्य जिल्हा नियोजन निधी खर्चात आपला जिल्हा 32 वरून राज्यात पहिल्या क्रमांकवर आणला आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन व आभार मानतो. जिल्ह्यात आर्थिक शिस्त आणण्यासाठी टाकलेलं हे पाहिलं पाऊल आहे. आलेला निधी हा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. शेवटी निधी काढणं हे जिल्ह्यासाठी योग्य नाही. ते राणे साहेबांना देखील आवडणार नाही. जिल्ह्याच्या विकासाच्या आड जो येईल त्याला सोडणार नाही. जे अधिकारी दिरंगाई करत होते त्यांना समज दिली आहे, असे स्पष्ट मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना ढ म्हणून संबोधले आहे. नितेश राणे म्हणाले की, “गुंतवणूकसाठी आपला जिल्हा आकर्षक केंद्र बनावा यासाठी प्रयत्न करू. नरडवे धरण प्रकल्पाचे लवकरच काम सुरु होईल आणि लोकांना देखील पैसे मिळतील. मलाड पोलीस आणि पोस्ट मॉर्टम रिपोर्टबाबत दिशा सालियनच्या वडिलांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जर आर्थिक स्थिती योग्य नव्हती तर मग ती लग्न कसं करणार होती. उद्धव ठाकरेंचा आणि अभ्यास याचा संबंध येत नाही. तो ढ विद्यार्थी आहे” अशी टीका नितेश राणे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना सौगात-ए-मोदी याच्यावर नितेश राणेंवर टीका केली होती. ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या निवडणूकीवेळी बटेंगे तो कटेंगे असे नारे देण्यात आले. आता सौगात म्हणजे भेट द्यायला चालले आहेत. वर्षेभर मुस्लीम समाजाचे नाव्याने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची. असा हा प्रकार आहे. आमच्या येथे काही उडाणटप्पू आहेत. त्यांचा उल्लेख अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये केला आहे. ते सुद्धा आता टोपी घालून सौगात घेऊन जातात हे आम्हाला बघायचं आहे. तुम्ही आमच्यावर हिंदूत्व सोडल्याचा आरोप करतात तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. आता त्यांचे हे ढोंग उघड पडलं आहे. मोदी जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बोलले होते की मंगळसूत्र चोरलं जाणार. आता हिंदूंच्या मंगळसुत्राचे रक्षण कोण करणार?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.