संजय राऊतांनी शरद पवारांवर टीका केल्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला टोला. (फोटो - सोशल मीडिया)
नांदेड : दिल्लीमध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिदेंच्या राजकारणाचे कौतुक देखील केले. मात्र यामुळे ठाकरे गट नाराज झाला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर नाराजी व्यक्त करुन हल्लाबोल केला. यावरुन राजकारण तापले आहे. भाजपचे नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
नांदेडमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. मुनगंटीवार म्हणाले की, “संजय राऊत यांच्यासारख्या राज्यसभेत असणाऱ्या मोठ्या माणसाचे अतिशय छोटे मन आहे. ये अंदर की बात है, संजय राऊत महायुती के साथ है. असं वातावरण, स्वतः ते निर्माण करतात. महाभारतात कर्णाचा पराभव होण्याचे कारण शैल्य होता. त्याचा जो रथ चालक होता. मला वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय,” असा घणाघात सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्र पुरोगामी आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात वैचारिक विरोध असू शकते. पण अशा पद्धतीने कोणी कोणाचा सत्कार करायचा नाही, जन्मदिवसाच्या सदिच्छा द्यायचा नाही, त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही, हे कोत्या मनाचे लक्षण आहे. संजय राऊत धीरे धीरे महाविकास आघाडी संपावी यासाठी ते अंतकरणापासून अशा वक्तव्याने ते प्रयत्न करतात. त्यांना माझ्या मनापासून सदिच्छा आहेत. शुभकामना आहेत, ईश्वर महाविकास आघाडी संपवण्याच्या संकल्पनाला शक्ती देवो,” असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
शरद पवार व एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “कुणी कोणाला भेटल्यावर राजकारण होतं हे योग्य नाही, शरद पवार यांची 75 वी साजरी झाली, तेव्हा सगळे राजकीय पक्षाचे नेते त्यांच्यासोबत होते. कुणाच्या भेटीने दोन पक्ष एकत्रित येतील दोन सेकंदात अजून एवढे तरी राजकारणाचा ऱ्हास झालेला नाही. राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात. वैचारिक मतभेद आहेत म्हणून भेटी घ्यायच्या नाही, भेट घेतल्यावर संध्याकाळी रजिस्टर मॅरेज करणार आहेत असा भाव असल्यासारखा आहे. परवा देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, पुन्हा ते सुरू झालं, मला वाटते हे गैर आहे. कोणती ही मैत्री व्हायची असेल तर अशी उघडपणे भेट घेऊन होत नाही, ती गुप्त होते,” असे स्पष्ट मत भाजप नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.