कंगना रनौत यांनी विरोधकांना सुनावले (फोटो- ani)
खासदार कंगना रनौत यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
संसदेत एसआयआरवरून घमासान
ईव्हीएम हॅकिंगवरुन कॉँग्रेसची सरकारवर टीका
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान आज सभागृहात एसआयआर संसदेत गदारोळ झाल्याचे दिसून आले. भाजप खासदार कंगना रनौत यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. संसदेत कॉँग्रेसने ईव्हीएमवरून केंद्र सरकारवर टीका केली. ईव्हीएम हॅकिंगवरुन सरकारवर टीका केली. त्याला खासदार कंगना रनौत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी ईव्हीएम हॅक करत नाही तर जनतेचे हृदय चोरतात असे भाष्य केले आहे.
भाजप खासदार कंगना रनौत यांनी कॉँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. संसदेत बोलताना भाजप खासदार कंगना रनौत म्हणाल्या, “मी प्रियंका गांधी यांना आठवउण करू देऊ इच्छित आहे की, तुम्ही म्हणता जुन्या गोष्ट सोडा. आम्ही जुन्या गोष्टीबद्दल बोलणार नाही. भूतकाळातील नेत्यांबद्दल आम्ही बोलणार नाही. पण मला तुम्हाला तुमच्या आईबद्दल विचारायचे आहे.”
Delhi: BJP MP Kangana Ranaut says, "…I want to remind Priyanka Gandhi, who says, 'Leave the old matters, we will not talk about old things, we will not speak about past leaders.' But I want to ask about your mother: she did not have citizenship earlier; she received it in 1983,… pic.twitter.com/HiwNhg0c91 — IANS (@ians_india) December 10, 2025
पुढे बोलताना कंगना रनौत म्हणाल्या, “तुमच्या आईकडे पहिल्यांदा नागरिकता नव्हती. त्यांना 1983 मध्ये नागरिकता मिळाली. तरीदेखील त्यापूर्वी त्या मतदान करत होत्या. तुमचं भूतकाळ असो वा, वर्तमानकाळ तुमच्या कुटुंबाने कधीही या देशाचा, कायद्याचा आणि संविधानाचा आदर केला नाही.”
राहुल यांच्या आरोपांना अमित शाह यांचा थेट पलटवार
बुधवारी लोकसभेत निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केले. कॉँग्रेस पक्षाने केलेल्या मतचोरीच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले. त्यांच्या भाषणात शहा यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आणि काँग्रेस पक्षाला इतिहासाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की ते सभागृहात मतचोरीच्या तीन घटना सांगू इच्छितात.
पहिली ‘वोट चोरी’ (पंतप्रधान निवड)
स्वातंत्र्यानंतर, देशाचा पंतप्रधान कोण होईल हे ठरवण्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यावेळी सर्व प्रांतांच्या काँग्रेस अध्यक्षांनी प्रत्येक उमेदवाराला मतदान केले. सरदार वल्लभभाई पटेल यांना २८ मते मिळाली आणि जवाहरलाल नेहरूंना २ मते मिळाली. तथापि, नेहरू पंतप्रधान झाले.
३. तिसरी ‘वोट चोरी’ (सोनिया गांधींची नागरिकता)
पात्रतेचा अभाव, तरीही मतदार बनले. सोनिया गांधींना या देशाचे नागरिक होण्यापूर्वीच मतदार बनवण्यात आल्याचा आरोप करणारा वाद अलिकडेच दिल्लीच्या न्यायालयात पोहोचला आहे.






