मनसेच्या वतीने आज गोरेगाव येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेबाबत खळबळजनक आरोप केले आहेत. निवडणुकांबाबत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मतदान यादीत घोळ असल्याचा आरोप केला होता. अशातच आता राज ठाकरे यांनी देखील हा मुद्दा लावून ठरला. महाराष्ट्राच्या मतदारयादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. यामध्य़े सर्वाधिक मतदारयादीत घोळ असलेली शहरं म्हणजे . मुंबई, पुणे, नाशिक. य़ा ठिकाणी बोगस मतदान याद्याचं प्रमाण जास्त असल्याचं राज ठाकरे यांनी परखडपणे आरोप केले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथे 8 ते 8.5 लाख मतदार भरले आहेत या ठिकाणी अतिरिक्त मतदान होतंय असंही राज ठाकरे म्हणाले. जर निवडणूका अशाच पद्धतीने जिंकायच्या असतील तर मग का प्रचार करायचा, पैसे खर्च करायचे. उमेदवार द्यायचे? का जनतेला विश्वासात घ्यायचं? निवडणूक जिंकण्यासाठी आणि सत्ता हातात यावी यासाठी केला जाणारा हा गैरव्यवहार म्हणजे महाराष्ट्राचा आणि निष्पक्ष मतदारातचा अपमान आहे, असं सांगत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. स्थानिक पक्षांना संपवणं, मिटवून टाकणं आणि आपली सत्ता हळूहळू निर्माण करणं हा डाव आहे या सत्ताधाऱ्यांचा.

दिवसेंदिवस निवडणूका जसजशा जवळ येत आहेत, तसंतसं महाराष्ट्रातील राजकणात निवडणूक आणि मतदार यादी हा मुद्दा अत्यंत संवेदनशील होत आहेत.
मतदार यादीवरुन सुरु असलेला हा सावळा गोंधळ बाहेर पडलाच पाहिजे त्यासाठी फक्त एकट्या मनसेनेच नाही तर सर्व पक्षांनी एकत्र येत याबाबत पाठपुरावा करणं गरजेचं आहे, असं देखील राज ठाकरे म्हणाले. बोगस मतदार .याद्यांचा हा गैरप्रकार काही आताचा नाही. 2016-17 मध्ये EVM मशीन आणि मतदार यादींबाबत देखील मी आवाज उठवला होता. याविषयावर मी पत्रकार परिषद देखील घेतली होती. अनेकांना त्यावेळी माझ्या बोलण्याचं गांभीर्य कळलं नसावं. मात्र आता प्रत्येकाच्या विभागात जेव्हा या घटना घडू लागल्या तेव्हा कुठे काही जणांना आता जाग येतेय.
“अनेकजण म्हणतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण मतांमध्ये येत नाही. जर निवडणूकीच्या मतदार यादीतच सावळ गोंधळ असेल तर मत तरी कशी मिळणार? . स्थानिक पक्षांना संपवणं, मिटवून टाकणं, अशा मतदारयाद्या तयार करायच्या. त्यात घुसखोरी करुन विकत घेतलेली माणसं टाकायची. आता होणाऱ्या निवडणुकांची यादी 1 जुलैला बंद करुन टाकली आहे. विधानसभेत तर होतेच, पण आताही 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत ही धक्कादायक बाब आहे. साडे 8 लाख बोगस मतदार हे ठाणे, पुणे, नाशिक,आणि मुंबईसह प्रत्येक गावात भरले आहेत. जर याच खोट्या आणि गैरप्रकारावर निवडणूक लढवायची असेल तर का प्रचार करायची गरज आहे? असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.