मस्साजोग ग्रामपंचायतीवर स्वरूपानंद देशमुखांचे वर्चस्व! चुरशीच्या लढतीत ९२ मतांनी मिळवला विजय
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मस्साजोग ग्रामपंचायतीवर स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवला आहे. स्वरुपानंद देशमुख यंनी दिवंगत संरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव केला आहे. संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर सरपंच पद रिक्त झाले होते. स्वरूपानंद देशमुख यांनी अवघ्या ९२ मतांनी अश्विनी देशमुख यांचा पराभव केला आहे. गावच्या आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटांनी मोठी ताकद लावली होती. पण अखेर ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने आपला कौल दिला. निकाल जाहीर झाल्यानंतर स्वरुपानंद देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी गुलाल उधळत मोठा जल्लोष केला.
दोन वर्षांपूर्वी ९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर मस्साजोगचे सरपंचपद रिक्त झाले होते. संतोष देशमुखांच्या निधनामुळे संपूर्ण गावात गेले काही महिने तणावाचे वातावरणही होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाकडून आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडूनही करण्यात आली होती. अश्विनी देशमुख या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. त्यांना बिनविरोध संधी देऊन संतोष देशमुख यांना श्रद्धांजली द्यावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात येत होती.
मस्साजोग गावच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत स्वरुपानंद यांनी बाजी मारत विजय मिळवला आहे. शेवटपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार देत त्यांनी निवडणूक लढवली आणि अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले. या निकालामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना, विशेषतः Ashwini Deshmukh यांना सहानुभूतीची लाट मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, मतदारांनी सहानुभूतीपेक्षा विकास किंवा इतर मुद्द्यांना प्राधान्य दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
मतदानात १० टक्क्यांची वाढ
या पोटनिवडणुकीसाठी ७ एप्रिल २०२६ पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ही निवडणूक जिल्ह्यातील एकूण ८८ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचा भाग होती. २८ एप्रिल रोजी मतदान पार पडले.
मस्साजोगमध्ये एकूण २,२८४ मतदार असून यंदा विक्रमी ८४ टक्के मतदान झाले. मागील वर्षाच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत सुमारे १० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. सकाळी मतदानाचा वेग मंद असला तरी दुपारनंतर मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी गर्दी केली.
शांततेत प्रक्रिया, विजयानंतर जल्लोष
निवडणुकीदरम्यान किरकोळ गोंधळ वगळता मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकाल जाहीर होताच स्वरूपानंद देशमुख यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला.






