OnePlus चा धमाका! गेमचेंजर OnePlus Ace 6 Ultra लाँच; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है...
Android यूजर्स सावधान! या स्मार्टफोन्सवर लवकरच बंद होणार WhatsApp! आत्ताच करा हे काम
वनप्लस एस 6 अल्ट्रा स्मार्टफोन 12GB + 256GB, 12GB + 512GB, 16GB + 256GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 12GB + 256GB या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 48,400 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,799 म्हणजेच सुमारे 52,500 रुपये आणि 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,099 म्हणजेच सुमारे 56,700 रुपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,399 म्हणजेच सुमारे 60,800 रुपये आणि 16GB + 1TB या टॉप व्हेरिअंटची किंमत CNY 5,099 म्हणजेच सुमारे 70,500 रुपये ठेवली आहे. (फोटो सौजन्य – X)
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफेकशन्सबद्दल बोलायचं झालं तर, वनप्लस एस 6 अल्ट्रामध्ये 6.78-इंच फुल एचडी+ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईस 165Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. तसेच या फोनमध्ये 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे.
OnePlus Ace 6 Ultra launching in China today pic.twitter.com/Dp6zNCZyPR — OnePlus Club (@OnePlusClub) April 28, 2026
डिव्हाईसमध्ये फ्लॅगशिप मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे, ज्याची पीक क्लॉक स्पीड 4.21GHz पर्यंत जाऊ शकते. हँडसेटमध्ये 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेज देखील मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी वनप्लसच्या नव्या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. कॅमेऱ्याचा अपर्चर f/1.8 आहे आणि यामध्ये ऑटोफोकस व ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन देखील मिळणार आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 112-डिग्री फील्ड-ऑफ-व्यू वाला 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस देखील दिले आहे. डिव्हाईस 20x पर्यंत डिजिटल झूम आणि 60fps वर 4K व्हिडीओ रिकॉर्डिंगची सुविधा ऑफर करते. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 16-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये 120W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,600mAh बॅटरी दिली आहे.
Tech Tips: AC चालू पण थंडावा नाही? हे सोपे उपाय वापरा आणि कूलिंग करा फास्ट… जाणून घ्या सविस्तर
वनप्लसने त्यांच्या नव्या स्मार्टफोनसोबतच वनप्लस गन गॉड गेमिंग कंट्रोलर देखील सादर केला आहे. या कंट्रोलरची किंमत CNY 449 म्हणजेच सुमारे 6,200 रुपये आहे. यामध्ये एक एर्गोनोमिक ग्रिप डिझाईन दिले आहे. दीर्घकाळ गेम खेळताना आराम मिळावा असा त्याचा उद्देश आहे. हा कंट्रोलर स्मार्टफोनला आडव्या स्थितीत जोडला जातो.






