जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी लसूणचा वापर केला जातो. कोणतेही पदार्थ बनवताना लसूणची फोडणी दिल्यास पदार्थाची चव वाढण्यासोबतच सुगंध सुद्धा वाढतो. त्यामुळे आहारात कायमच लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. लसूणमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, कर्बोदके, फायबर आणि ॲलिसिन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित दोन लसूण पाकळ्या चावून खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण खावी. चला तर जाणून घेऊया उपाशी पोटी लसूण खाल्ल्यामुळे शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
उपाशी पोटी नियमित दोन पाकळ्या लसूण खाल्ल्यास महिनाभरात शरीरात दिसून येतील सकारात्मक बदल, कोलेस्ट्रॉल होईल नष्ट

हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. अशावेळी नियमित एक किंवा दोन लसूण पाकळ्या चावून खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होईल.

शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी लसूण खावा. बऱ्याचदा लसूण खाल्ल्यानंतर जिभेवर तिखटपणा जाणवतो. त्यामुळे लसूण मधात मिक्स करून खावा.

पोषक घटकांनी समृद्ध असलेली लसूण शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. कारण यामध्ये असलेले जीवाणूनाशक आणि विषाणूनाशक गुणधर्म संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी एक लसूण पाकळी उपाशी पोटी खावी. यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

गॅस, आम्लपित्त आणि अपचन इत्यादी पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लसूण खावा. तसेच जेवण बनवताना सुद्धा लसूणचा वापर करावा.






