खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील संयुक्त मोर्च्यावर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
Sanjay Raut Live : नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. मुंबईनंतर आता ठाकरे बंधूंनी आपला मोर्चा नाशिककडे वळवला आहे. नाशिकमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर आणि विविध मागण्यांसह शिवसेना व मनसेचा संयुक्त मोर्चा होत आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिकच्या संयुक्त मोर्चावर भाष्य केले आहे.
खासदार संजय राऊत नाशिकच्या संयुक्त मोर्चाबाबत म्हणाले की, “नाशिकमध्ये शिवसेना सक्रिय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा नाशिकमध्ये जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत असते. नाशिक पवित्र धार्मिक स्थान असून कुंभमेळ्याचे आयोजन केलं जाते. नाशिक श्रीरामाच्या नावाने आणि कुसुमाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने ओळखले जाणारे देखील शहर आहे. आज नाशिकमध्ये जी अवस्था आहे जी परिस्थिती झालेली आहे त्याच्या विरोधात या आधी देखील आंदोलन झाली. आणि आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये ड्रग्स विरोधात तुमची अराजकता निर्माण होत चाललेले आहे त्याच्या विरोधात आम्ही मोर्चा काढत आहोत,” अशी भूमिका खासदार राऊत यांनी व्यक्त केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “नाशिकमध्ये शहरात लोकांना पाणी नाही. अनेक समस्या आहेत ड्रग्सची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. हेच नाशिक शहर विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल आहे त्यांनी यावर उत्तर द्यावे, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसमोर नाशिकचा दौरा करावा व तेथील परिस्थिती जाणून घ्यावी. या राज्यातील लोकांच्या सहनशक्तीचा एक अंत असतो तो ह्या सरकारने पाहू नये,” अशी मागणी खासदार राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे राऊत म्हणाले की, “आपल्या पुण्यामध्ये, नाशिकमध्ये गुन्हेगारीने टोक गाठलेलं आहे. लोकांनी यांना मतदान केलंल नाही, वोट चोरी झाली, आणि हे सत्तेत आले. त्यांना या ठिकाणी त्यांची जागा दाखवावी लागेल. नाशिकमध्ये या मोर्चाचा आंदोलन शिवसेना तयार करत होती त्यानंतर आमच्या लोकांनी सुचवलं की मनसेला देखील यामध्ये घेतलं पाहिजे. त्यामुळे आमच्यासोबत बाळा नांदगावकर, संदिप देशपांडे आणि इतर लोक या आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सरसकट शब्द वापरलेला नाही. त्यावेळी काही गुप्त बैठका झाल्या, त्यानंतर आता सगळं बाहेर येत आहे. त्या ठिकाणी मराठ्यांची फसवणूक झाली हे आता बाहेर येत आहे. नक्कीच राज्यामध्ये राजकीय अराजकता निर्माण होणार आहे. जातिवादावरून ही राजकीय रक्त निर्माण होतं,” असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.