खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
Maratha Reservation : मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये उपोषण सुरु केले आहे. जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. यामध्ये हाय कोर्टाने निर्देश देत जरांगे पाटील यांच्या आंदोलकांना इशारा दिला आहे. तसेच मुंबई रिकामी करण्यास देखील सांगितले आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून देखील जरांगे पाटील यांना आझाद मैदान सोडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “न्यायालयाचे आदेश आहेत, न्यायालयाने मुंबईत करावयाच्या अनेक गोष्टी आहेत. जे मराठा आंदोलन आहेत ते महाराष्ट्राच्या राजधानी मध्ये आहेत नक्की शिस्त पाळली पाहिजे, न्यायालयाच्या किंवा सरकारच्या एकंदरीत चौकटीमध्ये आंदोलन करणे गरजेचे आहे हे न्यायालयाचा म्हणणं योग्य आहे. पण हे सगळे मराठी बांधव आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आले आहेत. घूसकोर आहेत का? ते उपरे किंवा परंप्रातीय आहे का तर नाही. ते दहशतवादी आहेत का ते दहशतवादी नाहीत फक्त त्यांना एका चौकटीत आंदोलन करणे गरजेचे आहे,’ अशी भूमिका खासदार राऊत यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार राऊत म्हणाले की,” न्यायालयाने ज्यांना बाहेर काढावे असे अनेक लोक मुंबई शहरात आहेत. गौतम अडाणीसह यांनी धारावीच गिळली आहेत. अनेक विषयावर न्यायालयात निर्णय लागत नाहीत. वर्षानुवर्ष, हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल. आम्ही वर्षानुवर्ष न्यायालयाचा प्रतिक्षा मध्ये असतो आम्ही आहोत शिवसेना आहे. आमच्या मराठी बांधवांना बाहेर काढण्यासाठी निर्णय झाला, आम्ही जे म्हणत आहोत न्यायालयाने एका विशिष्ट विचारांचे लोक, आहेत बसविले गेले आहे अगदी भाजपच्या प्रवक्त्यांपासून, त्याचा हा परिणाम नाही ना, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे,” अशी शंका खासदार राऊत यांनी व्यक्त केली.
अराजक निर्माण करायच हे या सरकारचे काम
खासदार संजय राऊत म्हणाले की, “मराठा आंदोलकांना पण जबरदस्ती हटवण्याचा उपक्रम करत असतील तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील स्वतःला जे मराठी किंवा मराठे समजतात त्यांना याचा जाब विचारावा लागेल. उप समितीच्या बैठकीचा छायाचित्र आज बघितला असेल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले चेहऱ्यावरती अजिबात गांभीर्य नाही हसत हसत काजू बदाम खात आहे, लोक बाहेर उपाशी आहे. या जातीला त्या जातीविरुद्ध उभ करायचं त्या जातीला या जातीविरुद्ध उभ करायचं कोर्टामध्ये माणसं पाठवायचे अराजक निर्माण करायच हे या सरकारचे काम आहे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे हेच राजकारण आहे, भारतीय जनता पक्षाच हेच राजकारण आहे. दोन मुख्य समाज एकामेकांसमोर उभे राहून रक्तपात करावा संघर्ष करावा हेच यांचं राजकारण. हे प्रकरण संपूर्ण चिघळाव भीमा कोरेगाव सारखा इंचक आंदोलन या महाराष्ट्रात घडावं असं काही लोकांना वाटत आहे हे माझी पक्की माहिती. भीमा कोरेगाव सारख हिंसक आंदोलन घडावं अशी काही लोकांची इच्छा आहे. अशा प्रकारचा आंदोलन चिघळाव गावागावात दंगली घडाव्या यासाठी मंत्रिमंडळातल्या काही शक्ती काम करत आहेत, आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. म्हणून हा विषय सरकारच्या अख्यातारीतला आहे न्यायालयाच्या नाही,” असा मोठा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे.