पुण्यात खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळेंचे सीएम देवेंद्र फडणवीसांना पत्र दिले आहे (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : संसदेमध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूकीसाठी मतदान देखील पार पडले आहे. यानंतर मात्र विरोधकांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासाठी दिल्लीमध्ये विरोधकांनी पत्रकार परिषद देखील घेतली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये अचानक मतदारांची संख्या अचानक वाढली कशी असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.
दिल्लीमधील पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेऊन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सोलापूरमधील म्हाडा विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तम जानकर हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. मरकटवाडीमधील मतदानाबाबत सर्वांना आरोप माहिती आहेत. ते निवडून आले असले तरी त्यांना अपेक्षित असे यश मिळालेले नाही. ते जिंकले आहेत तरी त्यांना पुन्हा निवडणूक व्हावी अशी इच्छा आहे. आणि हे पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी असल्याची माहिती, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार सुळे म्हणाल्या की, “निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेमध्ये मशीनचा वापर बंद केला पाहिजे. राज ठाकरेंनी देखील सांगितले आहे की त्यांच्या एका उमेदवाराला स्वतःचे मत देखील मिळालेले नाही. आम्हाला जे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं होतं त्याचसारखं आणखी एक चिन्ह दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आलं. यामुळे देखील मतदार बुचकळ्यात पडले. आणि दोन्ही चिन्हाला नाव देखील तुतारी देण्यात आलं. भाजपमधील एका नेत्याने याची कबुली देखील दिली आहे. आमच्या 11 जागांवर हे दोन एकसारखी चिन्ह असल्यामुळे निवडणुकीमध्ये आम्हाला फटका बसला,” असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार सुळे म्हणाल्या की, “तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणुस अशी दोन नावे निवडणूक आयोगाने दिली. यामुळेच आम्ही साताऱ्याची जागा हारलो. हे पण सत्ताधारी नेते मान्य करत आहेत. हा निवडणूकीची चिन्ह एक देणं, पक्ष फोडणे आणि मतदारांची नावं वाढवणं असा एकत्रितपणाने केलेला हल्ला आहे. तर कधी कधी मशीनचा गैरवापर केला जात आहे. आणि जर देशामध्ये सशक्त लोकशाही ठेवायची असेल तर निष्पक्षपणे घेणे गरजेचे आहे. हारण्याचे कोणतेही दुःख नाही. हे ठरवणारी जनता आहे. पण निवडणूक आयोग हे योग्य आणि पारदर्शक काम करणारे असले पाहिजे. जी मतदारांची यादी आम्ही मागत आहोत ती यादी फक्त द्या, लोकशाहीसाठी आम्ही फक्त ही मागणी करत आहोत,” असे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.