Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची मध्यरात्री गुप्त भेट? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

या भेटीबाबत ठाकरे शिवसेना आणि फडणवीस यांच्याकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही भेट प्रत्यक्षात झाली की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 25, 2026 | 02:37 PM
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची मध्यरात्री गुप्त भेट? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं
Follow Us
Follow Us:
  • देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • संजय राऊत यांच्या या प्रतिक्रीयेमुळे तर या प्रकरणात अधिकच सस्पेन्स
  • प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून हे वृत्त
 

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Meet at Midnight: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगला असलेल्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचा दावा काही माध्यमांकडून केला जात आहे. या भेटीवरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क- वितर्क लढवले जात आहेत. या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

ही बातमी समोर आल्यानंतर ना ना तर्कवितर्क लढवले गेले. महत्त्वाची बाब म्हणेज खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता, त्यांनी आपल्याला याविषयी काही माहिती नाही, फडणवीस आणि ठाकरे हेच त्यावर बोलतील, अशी प्रतिक्रीया दिली. संजय राऊत यांच्या या प्रतिक्रीयेमुळे तर या प्रकरणात अधिकच सस्पेन्स तयार झाला. अशातच यासंदर्भात थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना या भेटीविषयी माध्यमांनी प्रश्न केला. त्यावर फडणवीस यांनी स्पष्टपणे या भेटीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

Ratnagiri Crime: बायपास झाल्याचे माहित असूनही छातीवर हल्ला, रत्नागिरीत जुन्या वादातून हत्या;

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आम्हाला भेटायचं असेल तर ती लपून -छपून भेट घेण्याची आवश्यकता नाही. ती खुलेआमही होऊ शकते. लपवण्यासारखे असे कुठलेच विषय आमच्यामध्ये नाही. अशी कोणतीही भेट आमच्यात घडलेली नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवत आहेत. आमची अशी कोणतीही भेट घडली नाही. काही लोक जाणीवपूर्वक आमच्या भेटीच्या खोट्या बातम्या देत आहेत, त्या खोटारड्या हँडल्सना नोटीस बजावली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास फडणवीस आणि ठाकरे यांच्यात भेट झाल्याचा दावा करण्यात आला होता. पण या भेटीबाबत ठाकरे शिवसेना आणि फडणवीस यांच्याकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही भेट प्रत्यक्षात झाली की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.

Accident News: ही दोस्ती तुटायची नाय! पाण्यात पडलेल्या मित्राला वाचवायला गेला, शाळकरी मित्रांचा बुडून

राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कथित भेट विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. विशेषतः मध्यरात्री २ वाजता ही भेट झाल्याचा दावा समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना वेग आला. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसकडून २३ एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये “उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री सुमारे २ वाजता मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे भेट दिली,” असा दावा करण्यात आला होता.

मात्र, या सर्व चर्चांवर भाजपकडून स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी हा दावा फेटाळून लावत सांगितले की, “देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कोणतीही भेट झालेली नाही. अशा प्रकारची बातमी पूर्णपणे खोटी आहे.”  या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सोशल मीडियावर पसरलेल्या दाव्यांबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

 

Web Title: No need to meet in secret devendra fadnavis denies midnight meeting with uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • BJP
  • Breaking News
  • Mumbai Politics
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
1

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Police Bharti: महाराष्ट्र पोलिसात भरती होण्याची मोठी संधी! ८,१०० जागांवर मेगाभरती होणार? वाचा डिटेल्स
2

Police Bharti: महाराष्ट्र पोलिसात भरती होण्याची मोठी संधी! ८,१०० जागांवर मेगाभरती होणार? वाचा डिटेल्स

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’
3

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क
4

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.