काय घडलं नेमकं?
6 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी मेटे मोहल्ला परिसरातील कब्रस्तान जवळील रस्त्यावर शफी अब्दुल्ला वरवटकर (55) आणि आरोपींमध्ये जुन्या भांडणावरून वाद झाला होता. आरोपींची नावे अशरफ महामुद बोट, गणी ईस्माईल बोट आणि कादिर शमशुद्दीन घारे असे आरोपींचे नावे आहेत.
पुण्यातील वारजे परिसरात गोळीबाराचा थरार! 5-6 जण सलूनमध्ये शिरले अन्…
शफी यांचे हृदयाचे बायपास ऑपरेशन झाले हे माहिती असूनही आरोपींनी त्याच्यावर वार केले. त्यांना शिवीगाळ करत छातीवर हाताच्या बुक्क्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात शफी वरवटकर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र हे तिन्ही आरोपी तेव्हापासून फरार होते.
सापळा रचून अटक
आरोपी खेड शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळताच खेड एस.टी. स्टँड परिसरात सापळा रचून तिघांना अटक केली आहे. कादिर शमशुद्दीन घारे (48), गणी ईस्माईल बोट (54) आणि अशरफ महामुद बोट (५५) यांना रात्री 8.23 च्या सुमारास अटक करण्यात आली.
फेसबुक रिल्सचा सापळा! 5 रुपयांच्या नोटेसाठी 15 लाखांचे आमिष, वृद्धाची 9 लाखांहून अधिक फसवणूक
रत्नागिरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरीतील भाटमिऱ्या परिसरात राहणाऱ्या हेमंत मारुती शिवलकर या वृद्धाला एका ‘ट्रॅक्टर’ असलेल्या 5 रुपयांच्या नोटेचे आमिष दाखवून तब्बल 9 लाख 21 हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
उत्तर प्रदेशातील अमित चव्हाण नावाच्या संशयिताने फेसबुकवर रिल्स बनवून ‘5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चित्र असल्यास 15 लाख रुपये मिळतील’ अशी जाहिरात केली होती. हे रिल्स पाहून शिवलकर यांनी आरोपीशी संपर्क साधला आणि आपल्याकडे अशी नोट असल्याचे सांगितले. १५ लाख रुपये मिळवून देण्यासाठी काही शासकीय शुल्क किंवा प्रोसेसिंग फी भरावी लागेल, अशी बतावणी आरोपीने केली.
एकूण ९ लाख २१ हजारांची फसवणूक
ही फसवणूक सलग ५ महिने चालली. ऑगस्ट २०२५ पासून जानेवारी २०२६ या दरम्यान ही फसवणूक झाली. आरोपीने विविध खात्यांमध्ये शिवलकर यांनी गुगल पे द्वारे पैसे पाठवले. 15 लाख रुपये मिळतील या आशेने आजींनी थोडे-थोडे करत एकूण 9 लाख 21 हजार रुपये आरोपीला पाठवले. वारंवार पैसे भरूनही १५ लाख रुपये मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शिवलकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे उत्तर प्रदेशमधील अमित चव्हाणयाच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
“हा बाळाचा नाही, तिच्या निवडीचा प्रश्न”, सुप्रीम कोर्टाने ७ महिन्यांच्या गर्भपाताला दिली परवानगी
Ans: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात.
Ans: जुन्या भांडणातून वाद होऊन मारहाण करण्यात आली.
Ans: पोलिसांनी सापळा रचून खेड एसटी स्टँड परिसरातून त्यांना अटक केली.






