छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले आहे. महायुतीचे पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर जोरदार नाराजी भुजबळ यांनी व्यक्त केली होती. यानंतर अखेर छगन भुजबळ यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडली आहे. यानंतर नाशिकमधील भुजबळांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह आहे. त्याचबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे.
मागील वर्षी मराठा आरक्षणावरुन राज्यामध्ये मोठे आंदोलन झाले. संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत संपूर्ण ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली जात होती. या आंदोलनाचे नेतृत्व मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. या मागणीसाठी त्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभे करुन त्यांनी उपोषण केले. यामध्ये ओबीसी समाजासाठी लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तर छगन भुजबळ यांनी देखील हाके यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे लक्ष्मण हाके यांच्यामध्ये नवा हुरुप दिसून येत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भुजबळांना मंत्रिपद मिळाल्याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, “छगन भुजबळांचा समावेश यह तो झाकी है…,असं लक्ष्मण हाके म्हणाले. पुढे जाऊन जयंत पाटील, रोहित पवार यांचा मंत्रिमंडळात आणि सुप्रिया सुळे यांचा केंद्रामध्ये समावेश काही दिवसात महाराष्ट्राला पाहायला मिळेल, या सर्वांना सदिच्छा,”असं लक्ष्मण हाकेंनी सांगितले. तसेच “आगामी पंचायतराज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ओबीसी समोर आणि ओबीसी नेत्यांसमोर आव्हानांचे प्रश्न आहेत. त्यामुळे छगन भुजबळांच्या समावेशाने या लढाईला बळ मिळणार आहे,” असा विश्वास ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या आता निवडणूका आहेत. त्यामुळे तात्पुरता आनंद मिळावा म्हणून दिला असेल. त्याची चार पाच माकडं नाराज होती. त्यामुळे आता थोडाफार गुलाल उधळतील, दोन चार फुसके फटाके वाजवतील आणि ढोल लावून दोन चार उड्या मारतील. जिल्हा परिषदेला तेवढंच इवळायचं नाही म्हणून दिलं असेल, असा टोला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे. त्यामुळे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आनंद व्यक्त केला आहे.