भाजप-शिरोमणी अकाली दल यांच्यात युती होणार? (फोटो- सोशल मीडिया)
पंजाबमध्ये 2027 मध्ये होणार विधानसभा निवडणूक
माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंग यांच्या विधानाने चर्चा सुरू
खासदार हरसिमरीत कौर यांनी केले विधान
भाजप सध्या देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. दरम्यान भाजपने आता पंजाब जिंकण्यासाठी हालचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे. 2027 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. सध्या पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे. दरम्यान भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंग यांनी केलेल्या विधानाने भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात युती होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंग यांनी केलेल्या विधानानंतर खासदार हरसिमरत कौर यांनी देखील भाष्य केले आहे. पंजाबमधले विषय सोडवले जातील तेव्हाच भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात युतीवर चर्चा होऊ शकते असे विधान खासदार हरसिमरत कौर यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR साठी बारा राज्यांना दिली मुदतवाढ..काय आहे नवीन तारीख?
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी राजीनामा दिला. पंजाबच्या हिताशी व अधिकारांसाठी आम्ही मागेपुढे पाहिले नाही. यांचा पक्ष नेहमी पंजाब आणि पंजाबच्या लोकांसाठी लढत राहील. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंग यांनी भाजप नेता सुनील जाखड यांचा उल्लेख बिना शिरोमणी अकाली दल शिवाय भाजप पंजाबमध्ये कधीच निवडणूक जिंकू शकत नाही.
पंजाबमध्ये सध्या आम आदमी पक्षाची सत्ता आहे. भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. 2027 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पंजाबमधील अडचणी सोडवल्या तरच भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात युती होऊ शकते असे खासदार हरसिमरत कौर यांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपचे शीर्ष नेतृत्व कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
SIR च्या शेवटच्या तारखेत वाढ
निवडणूक आयोगाने विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेची अंतिम मुदत वाढवून आनंदाची बातमी दिली आहे. तुम्ही आता तुमचा SIR फॉर्म ११ डिसेंबरपर्यंत भरू शकता. सध्या १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे केले जात आहे. नागरिकांनी SIR फॉर्म भरावेत यासाठी बूथ-स्तरीय अधिकारी (BLOs) घरोघरी जाऊन काम करत आहेत. SIR भरण्याची पूर्वीची अंतिम मुदत ४ डिसेंबर २०२५ होती, परंतु आता ती ११ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Last Date Of SIR: SIRची शेवटच्या तारखेत वाढ; या दिवसापर्यंत भरा तुमचा फॉर्म
BLOs द्वारे घरोघरी पडताळणी आता ११ डिसेंबर २०२५ पर्यंत होईल. मतदान केंद्र पुनर्रचना देखील ११ डिसेंबरपर्यंत होईल. नियंत्रण तक्ता अद्यतन आणि मसुदा यादी तयार करण्याच्या तारखा १२ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२५ पर्यंत आहेत. मसुदा मतदार यादी १६ डिसेंबर रोजी प्रकाशित केली जाईल. त्यानंतर दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी १६ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ पर्यंत असेल.






