गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर घायवळला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी टीका झाल्यानंतर रामदास कदम यांनी गौप्यस्फोट केला (फोटो - सोशल मीडिया)
Ramdas Kadam News : मुंबई : गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ यामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्य़ावर जोरदार टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी देखील पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, मुलावर टीका होताच माजी मंत्री आणि आमदार रामदास कदम यांनी गौप्यस्फोट केले. घायवळला नक्की शस्त्र परवाना कोणी दिला याबाबत त्यांनी वक्तव्य केले. तसेच अनिल परब यांचा देखील खरपूस समाचार घेतला.
माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम हे मुलाच्या बचावासाठी पुढे आले आहेत. ते म्हणाले की, “पैशांसाठी खालच्या लेव्हला कोण गेलं, हे मी सांगणार आहे. तिथून बदनामी करायला सुरुवात झाली. ड्रमबीट बार कुणाचा आहे? ड्रमबीट बार ठाकरे कुटुंबाचा आहे. तो बंद का झाला? लायसन्स रद्द का झालं? कोणावर तुम्ही आरोप करताय, मी काळे, खोटे धंदे केले नाहीत. तो एफआयआर वाचला. त्यात लिहिलेलं 14 मुलींची वेटरसाठी परवानगी घेतलेली. त्यात एक मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती. म्हणून तो डान्सबार होतो का?” असा सवाल रामदास कदम यांनी विचारला. ते अनिल परब यांनी केलेल्या आरोपांवर बोलत होते. “मला कळल्यावर मी हॉटेल बंद केलं. लायसन्स सुद्ध सबमिट केलं. त्यानंतर दीड महिन्यांनी सभागृहात त्यांनी हा विषय मांडला” असं रामदास कदम म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी शस्त्रपरवानाबाबत देखील भाष्य केले. रामदास कदम म्हणाले की, “योगेश कमदला विचारलं मी, विधिमंडळाच्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेत विधिमंडळात मंत्र्यांना देखील आदेश देणार अशा व्यक्तीने त्याला सांगितलं, तो पण न्यायाधीशच आहे. योगेश कदमने सांगितल तो न्यायाधीशच आहे, मला नवा घ्यायचं नाही. त्याचं नाव योगेश कदमने मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. मोठी व्यक्ती आहे. उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. अशा व्यक्तीने शिफारस केल्यानंतर ही व्यक्ती स्वच्छ असेल, म्हणून गृहराज्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. कागदपत्र होते” असं रामदास कदम म्हणाले. सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याच्या योगेश कदमांच्या निर्णयावर टीका होताच रामदास कदम यांनी गौप्यस्फोट केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बारबाबत ठाकरे कुटुंबावर रामदास कदम यांनी निशाणा साधला. यापूर्वी रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह मातोश्रीवर का ठेवून घेतला असे म्हणत टीका केली. यावर ते म्हणाले की, भाडखाऊ, भाडखाऊ म्हणतात भाड कोण खातं ते सांगतो. बाळासाहेबांच्या बाबतीत त्यांची बदनामी होईल असं कोणतही वक्तव्य मी करणार नाही. बाळासाहेब आमचे दैवत होते, आहेत आणि राहणार. उद्धवजींनी मला सांगितलेलं हाताचे ठसे घेण्याबद्दल. यात काय वाईट आहे? स्विस बँकेसाठी घेतले असं का वाटतं? मी फक्त संशय व्यक्त केला. मला त्या खोलात जायचं नाही” असे देखील माजी मंत्री आणि आमदार रामदास कदम म्हणाले आहेत.