मुंबई महापालिका निवडणुकीत ध्रुवीकरणाला नाही, मुंबईच्या समस्यांवर उपाय हवा, सचिन सावंत यांचा हल्लाबोल
मुंबई : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणुकीच्या प्रत्येक वेळी धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवला जाण्यावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली असून, या निवडणुकीत मुंबईच्या खऱ्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली आहे.
सचिन सावंत यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे, “प्रत्येक निवडणुक आली तर भाजपाकडून ध्रुवीकरणाच्या अजेंडा राबवला जातो. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हेच पाहिले. हिंदू जन आक्रोश मोर्चे काढतात, एक है तो सेफ है, बटोगे तो कटोगे सारख्या घोषणा देतात. किंवा यांचे सर्व नेते द्वेष पूर्ण वक्तव्ये करतात. आताही मुंबई महानगरपालिका निवडणूक आली आणि फराळाच्या पिशव्यांतून घरात घरात शुभेच्छा देण्याऐवजी फराळाच्या नावाने द्वेष वाटत आहेत.
त्यांनी पुढे मुंबईकरांना आवाहन केले की, या निवडणुकीत धर्म, भाषा यांसारखे वाद चालू द्यायचे नाहीत. ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. मुंबई शहराचा बकालपणा कसा कमी करणार, नालेसफाई, दरवर्षी भरणाऱ्या पाण्यावर, पालिका रुग्णालयांच्या दुरावस्थेवर, शाळांच्या अव्यवस्थेवर, फुटलेल्या गटारांवर, संडासांच्या टाक्यांवर, महिलांसाठी अपुऱ्या व गलिच्छ शौचालयांवर, उध्वस्त फुटपाथांवर, खड्ड्यांवर, त्यात पडून मरणाऱ्या माणसांवर, प्रचंड ट्राफिकवर, कचऱ्यावर, खुल्या जागांवर, बिल्डरांच्या मनमानीवर, सत्ताधाऱ्यांच्या कंत्राटदारांशी असलेल्या संगनमतावर, पालिकेतील दलालांवर, बेफिकीर व्यवस्थापनावर, भ्रष्टाचाराच्या दलदलीवर, महायुतीने केलेल्या लुटीवर, वाढत्या कराच्या बोज्यावर, महापालिकेच्या आर्थिक दुर्द़शेवर ही चर्चा होईल.
“मुंबईकरांनो, देशाची आर्थिक राजधानी मुंबई प्रचंड आजारी आहे. मुंबई वाचवायची असेल तर मुंबईच्या तब्येतीची चर्चा करु, मुंबईकरांवरील प्रचंड तणावाची चर्चा करुया..त्यांचे जीवन कसे सुसह्य होईल यावर चर्चा करुया,” असे सावंत म्हणाले. यासाठी काँग्रेस पक्षाने मुंबईकरांच्या हितासाठी, मुंबईला खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पण संवेदनशील व माणसाच्या जीवनाची किंमत असलेले शहर बनविण्यासाठी भाजपाचा ध्रुवीकरणाचा अजेंडा हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रत्येक निवडणुक आली तर भाजपाकडून ध्रुवीकरणाच्या अजेंडा राबवला जातो. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हेच पाहिले. हिंदू जन आक्रोश मोर्चे काढतात, एक है तो सेफ है, बटोगे तो कटोगे सारख्या घोषणा देतात. किंवा यांचे सर्व नेते द्वेष पूर्ण वक्तव्ये देतात. आताही मुंबई महानगरपालिका निवडणूक आली आणि फराळाच्या पिशव्यांतून घरात घरात शुभेच्छा देण्याऐवजी फराळाच्या नावाने द्वेष वाटत आहेत. आता बस! या निवडणुकीत धर्म, भाषा हे वाद चालू द्यायचे नाहीत. ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे.
प्रत्येक निवडणुक आली तर भाजपाकडून ध्रुवीकरणाच्या अजेंडा राबवला जातो. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हेच पाहिले. हिंदू जन आक्रोश मोर्चे काढतात, एक है तो सेफ है, बटोगे तो कटोगे सारख्या घोषणा देतात. किंवा यांचे सर्व नेते द्वेष पूर्ण वक्तव्ये देतात. आताही मुंबई महानगरपालिका… https://t.co/dnBuFS4qju — Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 25, 2025
मुंबई शहराचा बकालपणा कसा कमी करणार ते सांगा? चर्चा मुंबईतील नालेसफाईवर होईल, दरवर्षी भरणाऱ्या पाण्यावर होईल, पालिका रुग्णालयांच्या दुरावस्थेवर , शाळांच्या अव्यवस्थेवर, फुटलेल्या गटारांवर,संडासांच्या टाक्यांवर, महिलांसाठी अपुऱ्या व गलिच्छ शौचालयांवर, उध्वस्त फुटपाथांवर, खड्ड्यांवर, त्यात पडून मरणाऱ्या माणसांवर, प्रचंड ट्राफिकवर, कचऱ्यावर, खुल्या जागांवर, बिल्डरांच्या मनमानीवर, सत्ताधाऱ्यांच्या कंत्राटदारांशी असलेल्या संगनमतावर, पालिकेतील दलालांवर, बेफिकीर व्यवस्थापनावर, भ्रष्टाचाराच्या दलदलीवर ,महायुतीने केलेल्या लुटीवर होईल, वाढत्या कराच्या बोज्यावर, महापालिकेच्या आर्थिक दुर्द़शेवर होईल.. मुंबईकरांनो, देशाची आर्थिक राजधानी मुंबई प्रचंड आजारी आहे. मुंबई वाचवायची असेल तर मुंबईच्या तब्येतीची चर्चा करु, मुंबईकरांवरील प्रचंड तणावाची चर्चा करुया..त्यांचे जीवन कसे सुसह्य होईल यावर चर्चा करुया. यासाठी यावेळी काँग्रेस पक्षाने मुंबईकरांच्या हितासाठी, मुंबईला खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पण संवेदनशील व माणसाच्या जीवनाची किंमत असलेले शहर बनविण्यासाठी भाजपाचा ध्रुवीकरणाचा अजेंडा हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे.






