खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार सतत होणाऱ्या दिल्ली दौऱ्यावरुन टीका केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
धुळे : सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये देखील हालचालींना वेग आला असून पक्षांनी तयारी सुरु केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
धुळ्यात खासदार संजय राऊत यांती पत्रकार परिषद पार पार पडली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांसह सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. राज्यात झालेले सत्तांतर हे लोक आणि हाव यातून झाले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबईची भाषा हिंदी आहे हे बोलणं म्हणजे आश्रित असल्याचं लक्षण असल्याचे देखील टीका संजय राऊत यांनी केली असून, गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत हे पांढरे पायाचे असल्याचे टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांचा देखील समाचार घेतला असून आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, त्यांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या तसेच नारायण राणे हे भाजपचे अश्रित असल्याची देखील टीका संजय राऊत यांनी केली आहे. यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या खात्याबाबत आणि शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधाने करत आहेत. अवकाळी पावसानंतर ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला. तसेच कृषी खाते म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी असून हे खातं मला दिलं असं वादग्रस्त विधान कोकाटे यांनी केलं. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, महायुती सरकारमध्ये शिक्षण, कृषी यासारखी चांगली खाती कोणालाही नको आहे. मलाईदार खात्यांकडे सर्वांचे लक्ष आहे. नगरविकाससारखी खाती नेत्यांना हवी आहेत. देश कृषीप्रधान आहे. परंतु मंत्री गांभीर्याने कृषी खाते सांभाळण्यास तयार नाही. शिक्षण खाते, कृषी खाते मंत्र्यांना शिक्षा वाटत आहे, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, फडणवीस यांच्यावर विश्वास ठेऊ नका. त्यांनी महाराष्ट्रातही मोदी फॉर्म्युला आणला आहे. त्यांनी पीए आणि पीएससाठी चाचणी घेतली. परंतु हे पीएस अन् पीए सर्वाधिक भ्रष्टाचारी आहेत. धुळ्यात शासकीय विश्रामगृहात मिळालेल्या रक्कम प्रकरणात अनिल गोटे यांनी हे उघड केले आहे. एकनाथ शिंदे यांचा सर्वांनी कचरा केला. परवा सर्वोच्च न्यायालयात तीन हजार कोटींचे लाच प्रकरण समोर आले. कचऱ्यापासून ते चिखलापर्यंत सर्वांचे पैसे खात आहे. त्यातून हे सरकार निर्माण झाले आहे, असा आरोप राऊत यांनी केला.