फायरब्रँड नेते तेजस्वी सूर्या अडकले लग्नबंधनात, कोण आहे ती शास्त्रीय गायिका? PM मोदींनी केलंय कौतुक
Tejasvi Surya Wedding : देशातील ‘मोस्ट एलिजिबिल बॅचलर्स’ आणि फायर फायरब्रँड नेते तेजस्वी सूर्या आणि शिवश्री स्कंदप्रसाद यांचा विवाह सभारंभ बेंगळुरूमध्ये थाटात पार पडला. शिवश्री स्कंदप्रसाद प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगना आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच तेजस्वी सूर्याच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या पण त्यांने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी याबाबतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. या हाय प्रोफाइल लग्नाला मीडिया कव्हरेजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तेजस्वी यांची गणना देशातील फायरब्रँड नेत्यांमध्ये केली जाते. त्यांच्या विधानांमुळे ते कायम चर्चेत असतात. पण ते एका साध्या मुलीच्या प्रेमात कसे पडले? याची उत्सुकताही लागली आहे.
ಬೆಂಗಳೂರು ದಕ್ಷಿಣ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಸಂಸದರಾದ ಶ್ರೀ ತೇಜಸ್ವಿ ಸೂರ್ಯ ಅವರ ವಿವಾಹ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಧರ್ಮಪತ್ನಿ ಶ್ರೀಮತಿ ಶೈಲಜಾ ಸೋಮಣ್ಣ ಅವರೊಂದಿಗೆ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಶುಭಕೋರಲಾಯಿತು.
ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಟಿವಿ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದ ಶ್ರೀ ಹೆಚ್.ಆರ್.ರಂಗನಾಥ್ ಅವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.
Attended the wedding ceremony of Bengaluru South… pic.twitter.com/qFdrdDSYOn
— V. Somanna (@VSOMANNA_BJP) March 6, 2025
काही काळापूर्वी तेजस्वी सूर्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. २०२१ मध्ये पाँडिचेरीमध्ये झालेल्या एका संगीत कार्यक्रमाचा हा व्हिडिओ होता. तेजस्वी सूर्या या कार्यक्रमात अचानक दाखल झाले होते. तेजस्वी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते, त्यावळे कार्यक्रमाला निमंत्रण नसतानाही ते या कार्यक्रमात पोहोचले होते. हा कार्यक्रम त्यांच्या कार्यक्रम यादीत नव्हता पण शिवश्री स्कंदप्रसाद या कार्यक्रमात नृत्य सादर करणार आहे असं समजलं, त्यावेळी त्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली.
आयोजकांना आणि तिथे उपस्थित असलेल्या रसिकांनाही हा एक सुखद क्षण होता. त्यांना कार्यक्रमात पाहून काहींनी आश्चर्यही व्यक्त केलं. तेजस्वीला पारंपरिक संगीताची खूप आवड आहे आणि त्याने शिवश्रीविषयी याआधी ऐकलं होतं. त्या कार्यक्रमात तेजस्वी सूर्याने स्टेजवरून शिवश्री स्कंदप्रसादचं कौतुक केलं.
कार्यक्रमानंतर तेजस्वीचे आभार मानताना शिवश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. ‘ही संध्याकाळ माझ्यासाठी खूप संस्मरणीय होती. हा क्षण मी कधीही विसरू शकत नाही, असं तिने म्हटलं होतं. आणि इथूनच तेजस्वी-शिवश्रीच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली.यानंतर शिवश्री गोवा हाफ मॅरेथॉनमध्ये तेजस्वीसोबत दिसली. यावेळी त्यांच्यात मैत्रिपेक्षाही अधिक जवळीक असल्याचं जाणवलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवश्री स्कंदप्रसाद यांचेही चाहते आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभात शिवश्रीने “पूजिसालेंडे हुवुगल थंडे” हे कन्नड भक्तिगीत गायलं होतं. मोदींनी कौतुक करत तिचं गाणं ट्विट केलं होतं. ‘शिवश्री स्कंदप्रसाद यांनी कन्नडमध्ये सादर केलेले हे भजन भगवान श्री रामांप्रती असलेली भक्ती आणि पारंपरिक संगीताचे महत्त्व प्रतिबिंबित करते.’ शिवश्री स्कंदप्रसाद यांचे हे सादरीकरण अद्वितीय आहे, असे उद्गार त्यांनी काढले होते.
शिवश्रीचे यूट्यूब चॅनेलवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने ‘पोन्नियिन सेल्वन – भाग २’ च्या कन्नड आवृत्तीत एक गाणे देखील गायले आहे आणि संगीताव्यतिरिक्त तिला ट्रेकिंग आणि वाचनाची आवड आहे. दरम्यान तेजस्वी-शिवश्री यांचं लग्न ६ मार्च थाटात पार पडलं आता ९ मार्च रोजी बेंगळुरूमधील गायत्री विहार, पॅलेस ग्राउंड येथे एक भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. सध्या, तेजस्वी आणि शिवश्री दोघेही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.