Local Body Election : राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी आज मतदान; उद्या निवडणुकांचा निकाल (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक नगरपरिषदांसह नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मात्र, न्यायालयीन प्रकरणांमुळे काही ठिकाणी निवडणूक स्थगित करण्यात आली होती. या स्थगित झालेल्या १६ जिल्ह्यांतील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान होणार आहे. तसेच याआधी झालेल्या नगर परिषद, नगर पंचायतींसह शनिवारी होणाऱ्या मतदानानंतर रविवारी (दि. २१) एकत्रितपणे मतमोजणी होणार असून, निकाल जाहीर केले जाणार आहेत.
राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकायांच्या निणयाविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्याची तरतूद होती. अपील दाखल करण्यात आलेल्या ठिकाणी निकाल २२ नोव्हेंबरपर्यंत येणे आवश्यक होते. त्यामुळे उमेदवारास त्याचे अर्ज मागे घेण्यास तीन दिवसांचा कालावधी मिळाला असता.
हेदेखील वाचा : Sangli Municipal Election 2025 : सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती
दरम्यान, काही ठिकाणी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केल्याने ही कार्यवाही नियमबाह्य असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. यामुळे अपील दाखल असलेल्या ठिकाणच्या निवडणुकांना आयोगाने स्थगिती दिली होती.
2 डिसेंबरला झाले मतदान
राज्यातील २४० नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान झाले. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपालिका व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान होणार आहे.
अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण
राज्यातील तब्बल २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान काही दिवसांपूर्वी पार पडले. गेल्या अनेक वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, खऱ्या अर्थाने या निवडणुकीने राज्याच्या राजकारणात मोठा रंग भरला आहे. आता सर्वांचे लक्ष येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.
हेदेखील वाचा : Sangli Municipal Election 2025: सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती






