फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार, 24 नोव्हेंबरचा दिवस. विनायक चतुर्थी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र धनु राशीत संक्रमण करेल. सूर्य आणि मंगळ चंद्राच्या बाराव्या घरात असल्याने अनाफा योग तयार होईल. वृश्चिक राशीत सूर्य आणि मंगळाची युती देखील आदित्य मंगळ योग तयार करेल. आदित्य मंगल योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
आदित्य मंगळ योगाचा फायदा मेष राशीच्या लोकांना होणार आहे. या योगामुळे तुमचा आजचा दिवस चांगला राहील. या काळात जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना अपेक्षित यश मिळेल तर नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच धार्मिक कार्यामध्ये देखील सहभागी होऊ शकता.
कर्क राशीच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुमच्या व्यवसायातील कोणत्याही समस्या सोडवल्या जाण्याची शक्यता आहे. तुम्ही शिक्षण आणि व्यवस्थापनात चांगली कामगिरी करू शकाल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळेल. सरकारी कामात वरिष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. म्ही एका मोठ्या करिअर संधीचा फायदा घेऊ शकाल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. यावेळी तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. तुम्हाला चांगली कमाईची संधी मिळू शकते. विरोधक आणि शत्रू तुमच्या प्रतिभेने आणि कार्यक्षमतेने आश्चर्यचकित होतील. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात कोणत्याही कामासाठी किंवा निविदेसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांना बँकिंग आणि विमा क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदेशीर संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. बुद्धिमत्ता आणि हुशारी तुम्हाला नफा मिळविण्यात मदत करतील.
धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. तुम्हाला कामामध्ये महत्त्वाची संधी मिळू शकते. तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले कोणतेही काम पूर्ण होऊ शकते. व्यवस्थापन आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना फायदा होऊ शकतो. एखादी मोठी आणि अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुम्ही एखाद्याला उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.
कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या उत्पन्नामध्ये अपेक्षित यश मिळेल. तुम्ही विवध कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल अनावश्यक खर्च होऊ शकतो. तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






