फोटो सौजन्य- pinterest
आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचा संबंध एखाद्या ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. विशेषतः पाय हे जीवनातील स्थिरता, पुढे जाण्याची क्षमता आणि मानसिक संतुलनाशी जोडलेले आहेत. ज्योतिषशास्त्रात पायांशी संबंधित काही सवयी आपल्या ग्रहांच्या कमकुवतपणाचे प्रतिबिंबित करतात. या सवयी बहुतेकदा आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग असतात, परंतु त्यांचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. चालताना पाय घासत चालणे, बसल्यावर सतत पाय हलवणे, घाणेरडे पाय ठेवणे इत्यादी सवयीमुळे शारीरिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर ग्रहांच्या प्रभावानुसार देखील नुकसान करतात. ज्यावेळी आपण या सवयींकडे दुर्लक्ष करतो त्यावेळी शनि, राहू, मंगळ आणि चंद्र यासारख्या महत्त्वाच्या ग्रहांचे असंतुलन जीवनात संघर्ष, मानसिक ताण आणि आर्थिक त्रासांच्या स्वरूपात प्रकट होते. या सवयींचा परिणाम केवळ तुमच्या वैयक्तिक जीवनावरच नाही तर तुमच्या कुटुंबावर, संपत्तीवर आणि सामाजिक प्रतिष्ठेवरही होतो. कोणत्या वाईट सवयींचा ग्रहांवर कशाप्रकारे प्रभाव पडतो ते जाणून घ्या
पास घासत चालणे ही केवळ शारीरिक सवय नसून त्याचा संबंध शनि देवाच्या कमकुवतपणाशी देखील आहे. शनि ग्रहाला शिस्त, कृती आणि न्यायाचा कारक मानले जाते. ज्यावेळी एखादी व्यक्ती सतत पाय घासत चालत असेल त्यावेळी त्या व्यक्तीला आळस आणि अनुशासनहीनतेचे लक्षण असते. या सवयीचा परिणाम राहू ग्रहावर होतो. त्याला गोंधळ, चिंता आणि मानसिक असंतुलनाचे प्रतीक मानले जाते. ज्यावेळी राहूचा अशुभ परिणाम जाणवतो त्यावेळी त्या व्यक्तीला ताण, मानसिक चिंता आणि आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते.
बसताना पाय हलवणे ही एक सामान्य सवय वाटू शकते, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, ती चंद्राच्या कमकुवतपणाचे प्रतिबिंब आहे. चंद्र मानसिक शांती, भावनिक संतुलन आणि मातृत्वाचे प्रतीक आहे. ज्यावेळी हा ग्रह कमकुवत स्थितीमध्ये असतो त्यावेळी ती व्यक्ती मानसिकरित्या अस्वस्थ आणि तणावग्रस्त राहते. सतत पाय हलवल्याने देवी लक्ष्मीला राग येतो, ज्यामुळे समृद्धी कमी होते आणि आर्थिक समस्या वाढतात. ही सवय टाळणे आणि बसताना पाय स्थिर ठेवणे महत्त्वाचे मानले जाते.
पायांची स्वच्छता आणि काळजी न घेतल्याने राहू आणि मंगळाचा अशुभ प्रभाव वाढतो. राहू हा अशुद्धता आणि अव्यवस्था यांचे प्रतीक आहे, तर मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि क्रोधाशी संबंधित आहे. जर पायांची काळजी घेतली नाही किंवा टाचांना भेगा पडल्या असतील, तर याचा वैवाहिक जीवनावर कौटुंबिक नातेसंबंधांवर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होतो.
तुमचे पाय व्यवस्थित ठेवायला शिका.
पाय घासत चालण्याची सवय सोडून द्या.
दररोज तुमचे पाय स्वच्छ करा आणि त्यांची काळजी घ्या. भेगा पडलेल्या टाचांवर नियमितपणे उपचार करा.
योग्य आकाराचे आणि आरामदायी शूज घाला.
पायांची मालिश आणि हलका व्यायाम करून ऊर्जा आणि संतुलन राखा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ही सवय बहुधा तणाव, बेचैनी, चिंता किंवा ऊर्जा जास्त असणे यामुळे निर्माण होते. कधी कधी हे व्यक्तीच्या स्वभावाचेही लक्षण असू शकते.
Ans: अस्थिरता, चंचलता किंवा बेचैनी वाढल्यास चंद्र, मंगळ किंवा बुध ग्रह असंतुलित असल्याचे संकेत मिळतात.
Ans: दीर्घकाळ ही सवय राहिल्यास मानसिक ताण, एकाग्रतेचा अभाव, थकवा, स्नायू दुखणे किंवा अस्वस्थता वाढू शकते.






