संग्रहित फोटो
चिपळूणमधील या शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते व संबंधित विषयातील तज्ज्ञही यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. लहान शहरे व निमशहरी भागातील नागरी समस्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना, विकास कामांची गुणवत्ता, तसेच नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा कसा करावा याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे प्रतिनिधी अधिक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख व्हावेत, या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पुढील टप्प्यांमध्ये इतर विभागांतील उमेदवारांसाठीही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
हे सुद्धा वाचा : वाहनचालकानो सावधान! थकित दंडाची रक्कम 30 दिवसात भरा, नाहीतर…; पुणे पोलिसांचा इशारा
हर्षवर्धन सपकाळांनी सौंदाळा गावाचे केले कौतुक
आज सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे, हा आदर्श राज्यात सर्वदूर पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील जातमुक्त सौंदाळा गावाला भेट देऊन गावकऱ्यांचे अभिनंदन करत संवाद साधला. सौंदाळा गावाने एकता, समता आणि बंधुभाव यांचा संदेश देत खूप मोठे पाऊल टाकले असून आज राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जयंती आहे. गाडगेबाबा हे स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक न्याय आणि मानवतेचे प्रबोधन करणारे थोर संत होते. त्यांच्या विचारांशी पूर्णपणे जुळणारा हा निर्णय म्हणावा लागेल. अज्ञान, भेदभाव आणि अस्वच्छतेविरुद्ध लढणाऱ्या गाडगे बाबांच्या मार्गावरच सौंदाळा गाव चालत आहे. गढूळ झालेल्या वातावरणात सौंदाळा गावाने तुरटी फिरवण्याचे काम केले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.






