फोटो सौजन्य- pinterest
देवासमोर दिवा लावणे काय सांगितलं शास्त्रार्थ? दिव्यात किती वाती असावी, दिवा कोणत्या दिशेने लावावा. तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षतांचे आसन अर्थात दिव्याखाली अक्षता ठेवाव्या? दिवा विझला तर काय करावे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे धर्मशास्त्रामध्ये देण्यात आलेली आहे.
कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो. पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन अग्नी देवतेला केले जाते. यानंतर पूजा झाल्यानंतरही देवासमोर दिवा लावला जातो. देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते, अशी मान्यता आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते. अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो; त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होते. प्रदूषण दूर होते. दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो.
दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत. तेलाचा दिवा आपल्या डाव्या हाताला ठेवावा आणि तुपाचा दिवा आपल्या उजव्या हाताला असायला हवा. धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी. आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात आल्या आहेत. पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
देवावर अंधार पडेल अशा ठिकाणी दीप ठेवू नये. अनेक वाती लावणे असल्यास विषम प्रमाणात म्हणजे १-३-५-७ अशा लावाव्यात. दीप लावताना त्यात वातीशिवाय थोडे तेल घालावे. निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये कारण तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे. म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही. नाहीतर तम तत्व वाढेल .
तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षतांचे आसन अर्थात दिव्याखाली अक्षता ठेवाव्या. त्यावर आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा. देवी लक्ष्मी अक्षतांचे आसन ग्रहण करते, असे मानले जाते म्हणून अक्षता ठेवल्याने देवी विराजमान होते.
देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला, तर तो अशुभ संकेत मानले जाते. मात्र, धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही. त्यामुळे दिवा विझल्यास घाबरून जाता कामा नये. देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा. मात्र, दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला, तर त्यासाठी दीपपतन नावाची शांत करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला, त्याच ठिकाणी ती शांत करावी, असे सांगितले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हिंदू धर्मात दिवा लावणे हे अत्यंत पवित्र मानले जाते. दिव्याचा प्रकाश अंधकार दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि देवतांची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.
Ans: पूजेमध्ये शुद्ध तुपाचा दिवा अत्यंत शुभ मानला जातो. तसेच काही ठिकाणी तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवाही लावला जातो. मात्र तूप आणि तेल एकत्र वापरणे टाळावे असे सांगितले जाते.
Ans: नियमित दिवा लावल्याने घरातील वातावरण पवित्र आणि शांत राहते. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांती वाढते, अशी धार्मिक मान्यता आहे.






