फोटो सौजन्य- pinterest
गणपती बाप्पाळला प्रसन्न करण्यासाठी चतुर्थीचा दिवस खास मानला जातो. बाप्पाला कोणत्या गोष्टी आवडतात सर्वांनाच माहीत आहे, या दिवशी काय अर्पण करावे पण कोणत्या गोष्टी अर्पण करू नये तुम्हाला माहिती आहे का ? या गोष्टी अर्पण करणे अशुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पूजा करतात कोणत्या चुका करू नये, जाणून घ्या
शंकराप्रमाणे गणपतीला तुळस अर्पण करणे वर्जित मानले जाते. कारण असे म्हटले जाते की, गणपती बाप्पाने तुळशीला शाप दिला होता. म्हणून नैवेद्यात तुळशीच्या पानाचा वापर केला जात नाही.
गणपती बाप्पाला शिळी आणि सुखलेली फुले आवडत नाही. जर तुम्ही बाप्पाला फुले अर्पण करू शकला नाही तर फक्त दुर्वा अर्पण कराव्यात. मात्र, गणपती बाप्पाला कधीही शिळी आणि सुखलेली फुले अर्पण करू नये.
मान्यतेनुसार, गणपतीला अडथळे दूर करणारा मानला जातो. यामुळे तुमच्यावर येणारे अडथळे दूर होतात, असे म्हटले जाते. गणपतीला कधीही सुकलेले आणि तुटलेले तांदूळ अर्पण करू नये. नावाप्रमाणेच अक्षत म्हणजे अशी वस्तू नष्ट करता येत नाही, जे कधीही तोडता येत नाही. गणपतीच्या पूजेमध्ये तांदूळ अर्पण केले जाते परंतु ते थोडेसे ओले केल्यानंतरच अर्पण करावे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही ते दूध किंवा पाण्याने भिजवू शकता.
गणपती बाप्पाची पूजा करताना अनेक फुलांचा समावेश केला जातो. पण त्यामध्ये लाल किंवा पिवळ्या रंगांच्या केतकीच्या फुलांचा समावेश करावा. कारण गणपती बाप्पाला पांढरी फुले अर्पण करत नाही.
गणपती बाप्पाची पूजा करताना पांढऱ्या वस्तूंचा समावेश करणे निषिद्ध मानले जाते. पौराणिक कथेनुसार, चंद्रदेवाने चंद्रदेवाने गणपतीची खिल्ली उडवली होती त्यामुळे गणपतीने त्यांना शाप दिला होता. त्यावेळेपासून गणपती बाप्पाला पांढऱ्या वस्तू आवडत नाही, असे मानले जाते. गणपती बाप्पाची पूजा करताना पांढऱ्या रंगांची फुले, पवित्र धागा, पांढरे चंदन, पांढरे कपडे इत्यादीचा समावेश केला जात नाही.
गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना पांढऱ्या रंगांच्या मिठाईचा नैवेद्य दाखवला जात नाही. अशावेळी गणपती बाप्पाला मोदक किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा नैवेद्य दाखवताना तो हलका पिवळा किंवा केशर रंगांचा असतो आणि ते शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)