फोटो सौजन्य- pinterest
बरेच जण आर्थिक समृद्धीसाठी हाताच्या बोटामध्ये कासवाची अंगठी घालतात. कासवाच्या अंगठीचा ती घालणाऱ्या व्यक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे तुम्हाला माहीत आहे का? ज्योतिषशास्त्रानुसार, कासवाची अंगठी घालण्याचे काही खास नियम आहेत जर या नियमांचे पालन न करता ही अंगठी परिधान केल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. बरेच जण रस्त्याच्या कडेला किंवा छोट्या दुकानांमधून कासवाच्या अंगठी खरेदी करतात आणि ती घालतात. पण कासवाची अंगठी कोणत्या धातूची असावी हे बऱ्याचदा आपल्याला माहीत नसते. त्यामुळे व्यक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कासवाची अंगठी घालण्याचे नियम जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रामध्ये कासवाला खूप भाग्यशाली समजले जाते. त्याला सुख, समृद्धी, संपत्ती आणि सौभाग्यचे प्रतीक मानले जाते. कासवाच्या अंगठीचा संबंध देवी लक्ष्मीशी असल्याचे म्हटले जाते. जर ही अंगठी परिधान करताना योग्य नियम पाळले तर तुमच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न राहते असे म्हटले जाते. या अंगठीला वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात शुभ मानले जाते.
असे म्हटले जाते की, कासवाची अंगठी घातल्याने व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख मिळते आणि सर्व येणारे अडथळे दूर होतात. कासवाला शांती आणि संयमाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे ही अंगठी परिधान करणाऱ्या व्यक्तीला अधिक संयम राहील आणि जीवनात शांती राहील. जी व्यक्ती ही अंगठी परिधान करते त्या व्यक्तीला कधीही पैशाची समस्या जाणवत नाही. नोकरी आणि व्यवसायातही यश मिळेल. त्याच्या सर्व समस्या दूर होतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, कासवाची अंगठी घातल्यावर त्याचा चेहरा नेहमी तुमच्याकडे असावा. तरच संपत्ती तुमच्याकडे आकर्षित होईल आणि जीवनात सुख आणि समृद्धी येईल. जर चेहरा बाहेरच्या दिशेने असेल तर संपत्ती पाण्यासारखी वाहते. शास्त्रात म्हटल्याप्रमाणे चांदीच्या कासवाच्या अंगठीला मान्यता आहे, कारण ती चंद्र, बुध आणि लक्ष्मीचे प्रतिनिधित्व करते.
कासवाची अंगठी काढून टाकल्यानंतर ती पुन्हा घालण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहे. ही अंगठी कुठेही ठेवता येत नाही. ती काढून टाकल्यानंतर ती अंगठी देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवावी लागते. यानंतर, दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर त्या दुधाने भरलेल्या भांड्यात ठेवा आणि नंतर ती देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवा आणि पुन्हा घाला. ओम श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा.
कासवाची अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटावर परिधान करावी. ही अंगठी शुक्रवारी परिधान करणे शुभ मानले जाते कारण शुक्रवार हा धनाची देवी लक्ष्मी आणि भौतिक सुखसोयींचा ग्रह शुक्र यांना समर्पित असतो. शुक्रवारी ही अंगठी परिधान केल्याने धनसंपत्ती वाढते आणि लक्ष्मीची कृपाही कायम राहते.
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी ज्योतिषाचा सल्ला घेतल्याशिवाय कासवाची अंगठी घालू नये. जर या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घातली तर ते ग्रह दोषांचे बळी ठरू शकतात त्यामुळे या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते.
कासवाची अंगठी शुद्ध न करता घालणे अशुभ आहे. परिधान करण्यापूर्वी गंगाजल, दूध, शुद्ध पाणी, मध, तूप इत्यादींपासून बनवलेल्या पंचामृताने अंगठी शुद्ध करा. नंतर, अगरबत्ती आणि दिवे लावल्यानंतर, लक्ष्मी मंत्र किंवा कासवाच्या बीज मंत्राने ती अभिषेक करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)