फोटो सौजन्य- pinterest
2026 मध्ये शनि, राहू आणि केतूच्या महत्त्वाच्या ग्रह बदलांमुळे काही राशींच्या लोकांना ताण आणि समस्यांना सामोरे जावे लागेल. याचा परिणाम प्रत्येक राशीच्या जीवनावर होताना दिसून येऊ शकतो. शनि, राहू आणि केतूचे बदल ही ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाची घटना आहे. कर्म देणारा शनि मीन राशीत असल्याने राहू कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. त्यानंतर तो 2026 मध्ये मकर राशीमध्ये संक्रमण करणार आहे. केतू सिंह राशीत आहे आणि 2026 मध्ये तो कर्क राशीमध्ये प्रवेश करेल.
ग्रहांच्या या संक्रमणाचा काही राशींच्या जीवनात बदल घडवून आणू शकतात तर काही राशींसाठी हा काळ शुभ ठरेल. तर काहींना आव्हाने आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खासकरुन शनि, राहू आणि केतूच्या संक्रमणाचा हा काळ काही राशीच्या लोकांवर संक्रमणाचा परिणाम होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
2026 मध्ये शनिच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना काही अडचणी येऊ शकतात. या संक्रमणादरम्यान कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेणे कठीण होऊ शकते. मानसिक ताण आणि थकवा देखील जाणवू शकतो. राहू आणि केतूच्या संक्रमणामुळे नातेसंबंधांवर आणि आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या काळात तुम्हाला अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
मीन राशीत शनिचे होणारे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक काळ आणू शकते. आरोग्य आणि कौटुंबिक समस्यांमुळे हा काळ तणावपूर्ण असू शकतो. यावेळी तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडकल्यासारखे वाटू शकते. राहूच्या प्रभावामुळे तुमच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकतो. तुमच्या आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
केतूच्या कर्क राशीतील संक्रमणाचा परिणाम कर्क राशीच्या लोकांवर खोलवर होणारा आहे. 2026 च्या अखेरीस केतू कर्क राशी सोडून सिंह राशीत प्रवेश करेल, परंतु या काळात तुम्हाला मानसिक अशांतता आणि कौटुंबिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. नोकरीत किंवा व्यवसायात समस्या उद्भवू शकतात. उत्पन्नात अचानक घट होण्याची शक्यता आहे. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
शनिचे मीन राशीमध्ये संक्रमण आणि राहूचे कुंभ राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण याचा परिणाम तूळ राशीच्या लोकांवर होऊ शकतो. हा काळ कामात अडथळे आणि नवीन जबाबदाऱ्यांचा सामना करण्याचा असू शकतो. हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा असेल, परंतु सावधगिरी बाळगा आणि संयम बाळगा.
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असू शकतो. यावेळी 2026 च्या राहू मकर राशीत प्रवेश करेल ज्यामुळे तुमच्या जीवनात बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी नवीन संधी येऊ शकतात, परंतु तुम्हाला अनेक जोखीम पत्करावी लागतील. घाईघाईने घेतलेले निर्णय हानिकारक ठरू शकतात, त्यामुळे ही वेळ खूप काळजीपूर्वक घेण्याची आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: शनि आणि राहू हे दोन्ही धमीच्या गतीने, कर्म फलदायक आणि आर्थिक जीवनावर प्रभाव करणारे घटक आहे
Ans: ज्या राशीच्या जीवनात साडेसाती, शनिदृष्टी आहे अशा राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होईल.
Ans: शनि, राहू आणि केतूच्या बदलामुळे काही राशीच्या जीवनात ताण वाढू शकतो






