मोत्याचे दागिने परिधान केल्याने होतात 'हे' लाभ ; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?
नाकात नथ, कानात कुडी आणि गळ्यात तन्मणी हार अशा मोत्यांच्या दागिन्यांना महिला वर्गाची कायमच पसंती असते. मोत्यांच्या दागिन्यांची परंपरा देशात फार पुरातन आहे. मोत्यांच्या दागिन्यांना जसं परंपरेत महत्त्व दिलं जातं, तितकंच ज्योतिषशास्त्रात देखील महत्त्व आहे. मोती हे रत्न ज्योतिषशास्त्रात सर्वोत्तम मानलं जातं. प्रत्येक राशीप्रमाणे मोती वापरण्याचे वेगवेगळे लाभ आहेत. जाणून घेऊयात मोती या रत्नाचं ज्योतिषशास्त्रात नेमकं महत्त्व काय ?
ज्योतिषशास्त्रात मोती या रत्नाला शांतता आणि संयमाचं प्रतीक म्हटलं जातं. चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे पत्रिकेत
चंद्रबल कमकुवत असल्यास एखादी व्यक्ती अतिशय संवेदनशील असते. किंवा मानसिक नैराश्याने ग्रासलेली असते. अशा व्यक्ती नकारात्नक विचार जास्त करतात. त्यामुळे जन्मपत्रिकेतील चंद्रबळ वाढवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात मोत्याची अंगठी परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. विविध रंगाचे मोती बाजारात उपलब्ध आहे. मात्र पांढऱ्या रंगाचा मोती हा शुद्धता, शहाणपण, संयम आणि संपत्तीचे प्रतीक आहे,असं म्हटलं जातं. जर तुम्ही आयुष्यात खूप तणावग्रस्त, चिंताग्रस्त असाल किंवा तुम्ही अतिविचार करत असाल तर तुम्ही उजव्या करंगळीत चांदी आणि मोत्याची अंगठी वापरु शकता.
खरतर चंद्रबळ कमकुवत असलेल्या मंडळींना मोत्याची अंगठी वापरण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात दिला जातो. मोत्याची अंगठी कोणत्याही राशीच्या व्यक्ती परिधान करु शकतात. मात्र असं असलं तरी मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या मंडळींना मोत्याची अंगठी परिधान करणं लाभदायक ठरतं.
ज्योतिषशास्त्रानुसार मोत्याची अंगठी परिधान केल्याने भावनिक संतुलन राखण्यास मदत होते.
चांदी आणि मोती हे शांततेचे कारक असल्याने रागावर नियंत्रण ठेवता येते.
चंद्रबळ वाढवण्यासाठी मोत्याची अंगठी वापरली जाते.
तसंच जर तुम्हाला आत्मविश्वासाची कमरता जाणवत असेल तर तुम्हाला मोत्याच्या अंगठीचे सकारात्मक फायदे जाणवतील.
डोळ्यांचा त्रास, घशातील समस्या किंवा घातक किंवा अशुभ चंद्रामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी मोती रत्नांचा वापर केला जातो.हे तुम्हाला जीवनात प्रसिद्धी, आदर आणि संपत्ती मिळविण्यात मदत करते. मोत्याची अंगठी वापरल्याने मेंदूची शक्ती वाढते असं ज्योतिषशास्त्र सांगतं. ज्योतिषशास्त्राप्रमाणेच मोत्याची अंगठी वापरण्याची शास्त्रीय कारणं देखील आहेत.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी चांदी आणि मोत्याची अंगठी वापरणं फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला ही उष्णतेचा त्रास जाणवत असेल तर तुम्ही देखील चांदी आणि मोत्याची अंगठी परिधान करु शकता. ( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)