फोटो सौजन्य- pinterest
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यात ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह दोन वेळा संक्रमण करणार आहे. या संक्रमणाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाच्या संक्रमणाचा काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. बुध ग्रह हा वाद, व्यवसाय, बुद्धिमत्ता, मैत्री आणि गणितासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. बुध ग्रहाचे संक्रमण सर्व राशीच्या लोकांवर विविध प्रकारे परिणाम घडवून आणतो. या काळात काही राशीच्या लोकांना व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. डिसेंबरमध्ये बुध ग्रहाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
शनिवार, 6 डिसेंबर रोजी रात्री 8.52 वाजता बुध ग्रह आपली राशी बदलेल. यावेळी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. त्यानंतर सोमवार, 29 डिसेंबर रोजी बुध सकाळी 7.27 वाजता धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
बुध ग्रह मेष राशीच्या आठव्या आणि नवव्या घराचे स्वामी आहे. हे संक्रमण तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या करिअर आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळतील.
मकर राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहांचे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. या संक्रमणादरम्यान मकर राशीच्या लोकांमधील आत्मविश्वास वाढवेल. हे संक्रमण तुमच्या बाराव्या आणि अकराव्या घरात होणार आहे. प्रवास शक्य आहे. मित्र आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
मीन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहांचे संक्रमण फायदेशीर असणार आहे. बुध तुमच्या कर्मस्थानात आणि नवव्या भावात संक्रमण करणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. व्यवसाय वाढीमुळे आर्थिक लाभ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. त्यासोबतच तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






