फोटो सौजन्य- istock
बुध ग्रह कर्क राशी सोडून सूर्याच्या सिंह राशीमध्ये 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4.39 वाजता प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, संवाद आणि व्यवसायाचा प्रतीक मानले जाते. अशा वेळी सूर्याच्या राशीत प्रवेश करण्याला विशेष महत्त्व आहे कारण सूर्य आणि बुध ग्रह हे मित्र आहेत. यामुळे हे संक्रमण काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करु शकते. तर काही राशीच्या लोकांच्या जीवनात बदल होऊ शकतात.
पंचांगानुसार, बुध ग्रह 15 सप्टेंबर रोजी 10.58 वाजेपर्यंत सिंह राशीत राहणार आहे. यावेळी ज्या राशीच्या लोकांवर बुध ग्रहांचा प्रभाव असेल त्या लोकांना व्यवसाय, करिअर आणि वैयक्तिक जीवनात लाभ होण्याची शक्यता आहे. हा काळ काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
बुध ग्रहाचे सिंह राशीत होणारे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. हे संक्रमण वृषभ राशीच्या कुंडलीमध्ये चौथ्या घरामध्ये होत आहे. याचा संबंध घर, कुटुंब, मालमत्ता आणि सुखसोयींशी संबंधित आहे. या काळामध्ये तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मालमत्तेशी संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. खरेदी विक्री करण्यासाठी हा काळ चांगला आहे. घरात सुविधांमध्ये वाढ होईल आणि नवीन संसाधने मिळू शकतात. समाजामध्ये तुमचा आदर वाढू शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. काही वेळा तुम्हाला कामामध्ये अडथळे येऊ शकतात.
बुध ग्रहाचे सिंह राशीत होणारे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. हे संक्रमण कर्क राशीच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या घरामध्ये होत आहे. याचा संबंध धन, कुटुंब आणि वाणीशी संबंधित आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊन तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. त्यासोबतच तुमच्या बोलण्याच्या शैलीत सकारात्मक बदल होतील. तसेच या काळामध्ये तु्म्ही खेरदी देखील करु शकता. तुमची सर्व कामे या काळात पूर्ण होतील. कुटुंबात तुमचा आदर वाढेल आणि नातेसंबंध अधिक गोड होतील. हा काळ कुटुंबासाठी आनंदाचा राहील.
बुध ग्रहाचे सिंह राशीत होणारे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी उत्कृष्ट राहील. या काळात तुम्हाला करिअर आणि आर्थिक जीवनात नवीन संधी उपलब्ध होतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पुढे सरकू शकतात. तसेच व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारु शकते. तसेच या काळात तुम्हाला भावडांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. यावेळी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रगती आणि यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)