फोटो सौजन्य- pinterest
दिवाळीनंतर बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये संक्रमण करेल. हे संक्रमण शुक्रवार, 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.39 वाजता होईल. बुध ग्रह रविवार, 23 नोव्हेंबरपर्यंत संध्याकाळी 7.58 वाजेपर्यंत वृश्चिक राशीत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुद्धिमत्ता, संवाद आणि व्यवसायाचा कारक बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे सर्व राशींच्या जीवनात मोठे बदल होतील. वृश्चिक ही पाण्याची रास आणि स्थिर रास आहे, जी गूढता, खोली, अंतर्ज्ञान आणि परिवर्तनाचे प्रतीक आहे. वृश्चिक राशीत बुधाचे होणाऱ्या संक्रमणाचे प्रत्येक राशीवर वेगवेगळे परिणाम होणार आहे. बुधाचे होणारे संक्रमण मालमत्ता मिळवण्याची, नवीन नोकरीची आणि प्रगतीची शक्यता निर्माण करणारी असेल. बुध ग्रहाचे वृश्चिक राशीत होणारे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे, जाणून घ्या
बुध ग्रहांचे हे संक्रमण मेष राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये आठव्या घरात होत आहे. या काळात गुंतवणूक आणि आध्यात्मिक प्रवृत्तींचे ज्ञान वाढेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु अनावश्यक वाद टाळा.
बुध ग्रहांचे हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये सातव्या घरात होणार आहे. या काळात वैवाहिक जीवन चांगले राहील. गैरसमज टाळा. व्यावसायिक भागीदारीत नवीन संधी तयार होतील.
बुध ग्रहांचे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये पाचव्या घरात होणार आहे. या काळात अति भावनिकता हानिकारक ठरू शकते. तुम्ही अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी कराल.
कन्या राशीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहांचे हे संक्रमण तिसऱ्या घरात होणार आहे. या काळात तुमच्यामधील संवाद वाढेल. लहान भावंडांशी संबंध सुधारतील. लेखन, माध्यमे, संवाद किंवा प्रवास यातून तुम्हाला फायदा होईल. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी हा काळ चांगला राहील.
तूळ राशीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहांचे हे संक्रमण दुसऱ्या घरात होणार आहे. या काळात आर्थिक बाबतीत लक्ष केंद्रित करावे. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता किंवा गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तसेच तुम्ही खर्चावर देखील नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
वृश्चिक राशीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहांचे हे संक्रमण या राशीत होणार आहे. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांमधील आत्मविश्वास वाढवण्याचा, स्वतःला व्यक्त करण्याचा आणि नवीन संधी स्वीकारण्याचा हा काळ आहे. त्यासोबतच विचारपूर्वक बोलणे आणि संयम बाळगणे फायदेशीर ठरेल.
मकर राशीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहांचे हे संक्रमण अकराव्या घरात होणार आहे. याचा संबंध लाभ आणि प्रगतीमध्ये होणार आहे. त्यासोबतच तुमच्यामधील सामाजिक वर्तुळ विस्तारेल आणि तुम्हाला नवीन संपर्कांचा फायदा होईल.
कुंभ राशीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहांचे हे संक्रमण दहाव्या घरात होणार आहे. त्याचे हे संक्रमण करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी खूफ फायदेशीर आहे. बॉस आणि वरिष्ठांशी संबंध सुधारतील. पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
मीन राशीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहांचे हे संक्रमण नवव्या घरात होणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या नशिबावर आणि उच्च शिक्षणावर सकारात्मक परिणाम करेल. या काळात लांब प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरतील. धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञानात तुमची आवड वाढेल. शिक्षक आणि तुमच्या वडिलांशी संबंध अधिक दृढ होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)