फोटो सौजन्य- pinterest
तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकमेकांना सांगताय का? जर असे असेल तर आचार्य चाणक्यांच्या मते तुम्ही प्रगतीच्या मार्गावर कधीही पुढे जाऊ शकत नाही. आचार्य चाणक्य यांच्यानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या माणसाने स्वतःपुरत्या मर्यादित ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही काही गोष्टी इतरांना सांगितल्या तर तुमचे यश थांबते. जे लोक या 5 गोष्टी इतर लोकांपासून लपवून ठेवतात ते त्यांच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतात आणि निरुपयोगी गोष्टींपासून दूर राहतात. यामुळेच असे लोक भरपूर पैसे कमावतात. आचार्य चाणक्यांनी कोणकोणत्या गोष्टी लपवून ठेवायला सांगितल्या आहेत अर्थात चाणक्य नीतीमध्ये कोणाला सांगू नका हे जाणून घेऊया.
चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने आपल्या भविष्यातील योजना कोणालाही सांगू नये. असे केल्याने माणूस आधीच स्वतःसाठी अडचणी वाढवतो. भविष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्ही जी काही योजना करत आहात, त्या नेहमी गुप्त ठेवा आणि त्या कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या योजना जाणून घेतल्यानंतर लोक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने आपली आर्थिक स्थिती कोणालाही सांगू नये. तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरीही, तुम्ही तुमच्या उत्पन्नाबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल कोणाला सांगितले तर काही लोकांना तुमचा हेवा वाटू शकतो. दुसरीकडे, तुम्ही गरीब असाल किंवा वंचित जीवन जगत असाल, तर तुमची आर्थिक स्थिती जाणून घेऊन लोक तुम्हाला निराधार समजू लागतील.
आचार्य चाणक्य यांच्या मते, दोन लोकांमधील संभाषण फक्त दोन लोकांपुरते मर्यादित असावे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही कोणाशी एकांतात बोललात तर तुमच्या दोघांमध्ये काय घडले ते कोणाला सांगू नका. विशेषत: एखाद्याने खाजगीत तुमची प्रशंसा केली असेल किंवा तुमची मदत मागितली असेल तर ते गुप्त ठेवा.
आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने त्याच्या वैयक्तिक बाबी जसे की अयशस्वी प्रेम, भांडणे, घरगुती बाबी इत्यादी सांगू नये. असे केल्याने, काही लोक तुमच्या बोलण्यातून फायदा काढू शकतात आणि वेळ आल्यावर ते फायदा घेऊन तुमचे मोठे नुकसान करू शकतात. यामुळे तुमची मानसिक शांतता बिघडू शकते.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, तुम्ही तुमच्या आजाराचा उल्लेख कोणत्याही व्यक्तीसमोर करू नये. तुम्ही तुमचा आजार कोणाला सांगितल्यास ते तुमच्या विरोधात जाऊ शकते. तुमच्या आजारपणाचा म्हणजेच तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन लोक तुमचे नुकसान करू शकतात. त्याचे परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागू शकतात, त्यामुळे जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल, तर तुमच्या आजाराचा उल्लेख कोणाकडेही करू नका.
( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)